इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : बहुजन विकास अभियानाचे प्रणेते, अन्यायाविरुद्ध ठामपने लढणारे एक निर्भीड व्यक्तिमत्व संजयकुमार एकुर्केकर यांना राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने संभाजीनगर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात “राष्ट्रीय समाज गौरव” पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने क्लासेसचे मार्गदर्शक प्रा.गुंडप्पा पटणे व क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. गोरगरिबासाठी सतत झटत राहणारे उच्चशिक्षित असे प्रा.संजयकुमार एकुर्केकर हे ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाच आपण कांहीतरी देण लागतो, हा उदात्त हेतू समोर ठेवून, समाजातील गोरगरीब, वंचित लोकांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपडत असतात. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत. आजपर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला आशा हजारो लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते यशस्वीही झाले आहेत.आशा या समाज सुधारकाचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे व प्रा.संजयकुमार एकुर्केकर यांच्या हातून यापेक्षा मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य घडून यावे, व त्यांच्या कार्याच्या बाळावर त्यांना एकापेक्षा एक मोठे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळावेत. आशा शुभेच्छा यावेळी बोलताना प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी दिल्या. यावेळी बहुजन विकास अभियानाचे संजय राठोड, लक्ष्मण आडे, आकाश कस्तुरे, अमोल सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.