प्रा.रामदास केदार यांचे पटकथा लेखन पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

प्रा.रामदास केदार यांचे पटकथा लेखन पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील देऊळवाडी येथील प्रसिद्ध कवी तथा अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा उदगीर चे अध्यक्ष प्रा. रामदास केदार यांच्या मराठी चित्रपट पटकथा लेखन : तंत्र व कौशल्य या पुस्तकाची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या एम. ए. मराठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी महत्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आला आहे.हे पुस्तक लातूर येथील अरुणा प्रकाशनने प्रकाशित केलेले आहे. मराठी साहित्य व मराठी चित्रपटांचा अनुबंध विद्यार्थ्यांना अभ्यासता येईल. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मराठी साहित्याचे चित्रपट माध्यमांतर हा पेपर ठेवण्यात आलेला आहे. या पुर्वी बैल दौलतीचा धनी ही कविता नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष जून २०१९ पासून समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रा.रामदास केदार हे शिवाजी महाविद्यालय वाढवणा येथे मराठी विषयासाठी कार्यरत असून प्रायश्चित्त, घिसाड्याचं पोरं, गंप्या गुराखी, बन्याची शाळा, पोखरून पडलेली माणसं, बीनबूडाची माणसं, गळफास, पाऊस माझ्या मनातला, मराठवाड्याची आई, गुरुजींच्या कविता, कस्तुरी, कलरव, नव्या दमाच्या कथा, शब्दांकुर, चिमणी चिमणी खोपा दे, गावची जत्रा कारभारी सतरा, डोळ्यात दाटले पाणी हे काव्यमय श्यामची आई, बालसाहित्य वाटा आणि वळणे हा समीक्षा ग्रंथ, कपाटातील पुस्तके बाल कविता, कवितेचे अंतरंग हा समीक्षाग्रंथ,सृजनपर्व,प्रतीभेचे तारे साहित्यिक सुची इत्यादी ग्रंथ संपदा प्रकाशित झाली आहे. बिनधास्त जीवन या मराठी चित्रपटाची गाणी तसेच घुसमट, बेला, प्रायश्चित्त मराठी चित्रपटाची पटकथा व गीतलेखन केलेले आहे. दै एकमत व महाराष्ट्र टाइम्स या दैनिकातून शंभराहून अधिक पुस्तकांवर समीक्षा लेखन केलेले आहे. परभणी आकाशवाणी केंद्रावरुन बालसाहित्य मंडळ या कार्यक्रमात १२६ बालसाहित्यिकांची ओळख करून दिलेली आहे. मराठीचे माहेर घर असलेल्या पुणे विद्यापिठात निवड झाल्याबद्दल मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदिप सांगळे, समिती सदस्य सुनिताराजे पवार , संजय ऐलवाड , डॉ.श्रीपाल सबनीस, कौतिकराव ठाले पाटील, निर्माता राजेश पवार, डाँ. म.ई.तंगावार,सचिव चंदन पाटील, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, प्राचार्य मुंजेवार वाय. के., प्रा.. बिभीषण मद्देवाड. लक्ष्मण बेंबडे, रसूल दा पठाण, सिद्धार्थ सुर्यवंशी, अंबादास केदार, नीता मोरे प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका वैशाली सामंत, बेला शेंडे यांच्यासह पत्रकार, साहित्यिक ,कलावंत, अभ्यास मंडळ सदस्य मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

About The Author