वृक्षांमध्येच ईश्वरला पहा – भागवताचार्य प्रणिताताई धविले
भागवताचार्य प्रणिताताई धविले व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते वृक्षारोपण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील जूना औसा रोड भागातील कृषी नगर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात भव्य भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कथेतील सहाव्या दिवशी श्रीकृष्ण विवाह प्रसंगी माजी नगरसेविका शोभाताई पाटील यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हभप प्रणिताताई धविले व लातूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्ष हीच देवता आहे. त्याची मनोभावे पूजा करा. वृक्षांचे जतन करा. जे वृक्ष स्वतः कार्बनडायऑक्साईड घेतात आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात ते वृक्षच आपली खरी देवता आहेत म्हणून कोणीही वृक्षतोड करू नका. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावा. आणि त्याचे संवर्धन करा असे आव्हान यावेळी प्रणिता ताई यांनी जमलेल्या भाविकांना केले.
यावेळी 51 रोपट्यांची देणगी देणार्या माजी नगरसेविका शोभाताई पाटील यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विश्वस्तांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यापुढेही वृक्ष लागवडीसाठी आपण नेहमी सहकार्य करू असे आश्वासन ही शोभाताई पाटील व माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिले आहे. यावेळी काकासाहेब भोसले, विजय कोहाळे,भारती बिराजदार, विद्यादेवी भोसले, आशा पवार, भाग्यश्री खुणे, कुलकर्णीताई, चिल्ले, जाधव, नटवे,प्रा.ताबरवाडी, करप, प्रा.कासले सर, भैरुसाहेब देशमुख आदिजण उपस्थित होते.