कत्तलीसाठी आणलेल्या जर्सी गायीची पोलीसांनी केली सुटका
हत्यारासह दोघे अटकेत
हंडरगुळी (प्रतिनिधी) : हाळी ता.उदगीर येथे कत्तलीसाठी गाय आणली, तिची कत्तल पहाटे 3 वा.कसाई करणार आहेत.अशी टिप मिळताच सपोनी.भिमराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी.एम. के. गायकवाड,पोहेकाॅ.बळदे टी.टी. व पो.काॅ.कसबे,चालक चामे यांनी दि.8-8-23 ते दि.9/8/23 च्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एम.एस.बी.रोड लगत हाळी येथील कत्तल खाण्यात धाड टाकली असता, तेथे कत्तलीच्या हेतूने आणलेली जर्सी जातीची दुधाळ गाय आढळुन आली. तसेच कत्तलीसाठीचे लागणारे दोन मोठ्या कुऱ्हाडी,सात सतुरं, सुऱ्या व 100 किलोचे वजन करणारे जुना लोखंडी वजन काटा तसेच लोखंडी वजन मापे ई.जप्त करण्यात आले.,कत्तलीसाठी आणलेली दुधाळ गायींची कसायाच्या तावडीतुन सुखरुप सुटका करुन दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्या गायीची वैद्यकिय तपासणी तसेच गुन्हा नोंद करण्याचे काम पोलीस करत आहेत,विशेष म्हणजे गायीचा दाखल नसल्याने सदर गाय चोरीची असू शकते.तसेच या प्रकरणात मुख्य आरोपी हा दुसराच कोणी असुन तो फरार आहे.व अटकेतील दोघेजन नोकर आहेत. तसेच कित्येक वर्षापासुन येथे गो हत्या होत असल्याची आणि या गायीच्या वासराची पण हत्या त्या कसायाने केली असल्याची चर्चा हाळीतील जाणकार करत आहेत. तसेच हा धंदा किती वर्षापासुन व कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे? ही गाय चोरीची का विकतची ? तसेच अटकेतील कसाई गो माॅंस कुठे विकतात?कुठे विकणार होते? याची पण चौकशी होणे गरजेचे आहे.म्हणजे या गोरखधंद्यातील ” छुपेरुस्तम ” कोण? तसेच हंडरगुळीत पण हा धंदा होत असल्याची चर्चा आहे.एकंदरीत ही “धमाकेदार” कामगिरी प्रथमच झाली म्हणुन वाढवणा व हंडरगुळी येथील पोलीसांचे गो प्रेमींसह जाणकार जनता अभिनंदन करत आहे.कारण सहायक पोलीस अधिक्षक निकेतनजी कदम हे गत दोन वर्षात या भागात चाकुरहून येऊन मोठमोठ्या धाडी टाकल्या.पण वाढवणा पो.स्टे.चे तत्कालीन प्रमुख थानेदार हे अशा धंद्याकडे चतुराईने दुर्लक्ष करत होते.म्हणुन हे व इतर गैर धंदे गल्लो गल्ली बोकाळलेले बघून वाढवण्यात पोलिस ठाणे आहे का नाही ? असा प्रश्न उपस्थित होत होता.गत दोन वर्षात” राइंदरांना” भिणारी जनता पोलीसांना भित नव्हती.तसेच एका विशिष्ट गटाच्या लोकांची अवैध धंद्यात व रोडवर मुजोरी वाढल्याचे गत दोन वर्षात हाळी हंडरगुळीकरांनी पाहीले.पण निकेतनजी कदम यांच्या “दे-दणादण” कामगिरी नंतर त्यांच्या कदमांवर कदम ठेऊन नुतन सपोनी भिमराव गायकवाड हे इतर सहकारी पोलीसांसह अॅक्शन मोडवर आले असल्याने सहकारी पोलीस बांधवही “फुल्लं चार्ज ” झाल्यामुळे या भागात धमाकेदार कामगिरी पोलीसं करताना दिसतात.याचाच प्रत्यय हा गत तीस दिवसात जनतेला आलाय. तसेच कत्तलीसाठी आणलेल्या गो मातेची सुखरुप सुटका पोउपनी.एम. के. गायकवाड, बळदे,कसबे,चामे या कर्तबगार पोलीसांनी केली आहे.मात्र या प्रकरणात अटकेतले दोघे जण हे प्यादी असुन या धंद्याचा खरा “मास्टर” हा दुसराच असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कसायाच्या तावडीतून सुखरुप सुटका केलेल्या गो मातेचे वासरु असायला पाहीजे.कारण ही दुधाळ गाय आहे.व तीच्या वासराची कत्तल केली असावी.अशी भीती या गायीला बघणारे जाणकार व्यक्त करत होते. या प्रकरणात खोलात जाऊन सविस्तर माहिती घेतल्यास या गोरखधंद्याचा खरा “मास्टर” कोण? हा धंदा किती वर्षापासुन व कुणाच्या आशीर्वादाने चालत आहे? याचाही उलगडा होणे गरजेचे आहे.या धंद्याचा मुळ मालक असलेला कसाई हा फरार असुन त्याचेवर व अटकेतील आरोपींवर कडक कारवाई करावी.अशी मागणी हाळी हंडरगुळीतील गो प्रेमींची आहे.तसेच सपोनी व पोउपनी यांनी अशी कारवाई पहिल्यांदाच केल्यामुळे या गावातील जनतेतून खाकीची शान , मान उंचावलेल्या सपोनी,पोउपनी व इतर पोलीस बांधवांचे कौतूक होत आहे.