शास्त्री विद्यालयात क्रांतिकारकांना अभिवादन, अभिनव उपक्रमाने क्रांती दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी वर्गशः कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक वर्गाला एक क्रांतिकारक देऊन त्या क्रांतिकारकांच्या वेशभूषेसह माहिती सांगण्यात आली. प्रत्येक वर्गात पालकांना निमंत्रित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. वर्ग सजावटीसह क्रांतिकारकाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. उपस्थित पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
प्रारंभी मंचावर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या प्रथमेश पुरी या विद्यार्थ्याने भारावून टाकणारे क्रांती गीत गायले. ‘शिक्षणविवेक’ या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त या अंकात लेख प्रकाशित झालेले बाललेखक अंबिका ढोबळे,श्रूती पदाजी व सहशिक्षिका अनिता यलमटे ,प्राजक्ता जोशी यांचे सत्कार करण्यात आले.तसेच आॕगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंचावर मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार, लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले ,पालक प्रतिनिधी भाऊसाहेब माने,संस्कार मंडळ प्रमुख आशा गौतम ,अनिता मूळखेडे, उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार व मिनाक्षी कस्तूरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख संतोष गजलवार व श्रीपाद सन्मुखे यांनी परिश्रम घेतले.