तोंडार चे आरोग्य उपकेंद्र राहुल केंद्रे यांच्या प्रयत्नातून झाले – सौ.विजयाताई बिरादार
उदगीर : जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांनी तोंडार चे आरोग्य उपकेंद्रासाठी प्रयत्न करुन तोंडार येथे भव्य अशी 80लक्ष रु ची इमारत उभी केली आहे.असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. विजयाताई बिरादार यांनी सांगितले. तोंडार अंतर्गत वाड्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्या सौ. विजयाताई बिरादार व तत्कालीन सरपंच सौ. शैलेजा ताई पटवारी यांनी, अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या कडे पाठपुरावा केला होता. लागलीच राहुल केंद्रे यांनी या पाठपुराव्यामुळे तात्काळ या नवीन आरोग्य उपकेंद्र चा इमारती साठी 80 लक्ष रु मंजुर केले होते. आज ही भव्य दिव्य ईमारत उभी झाली असून, त्या वास्तु चा उद्घाटन सोहळा लवकरच होईल असे मत सौ. विजयाताई बिरादार, माजी सरपंच शैलेजा ताई पटवारी, सरपंच भरत कोचेवाड यांनी सांगितले, तोंडारच्या सभोवताली असलेले व या आरोग्य उपकेंद्राशी संलग्न असलेल्या वंजारवाडी, करलेवाडी, हणमंतवाडी, क्षेत्रफाळ, हंगरगा अशी अनेक गावे आहेत. आरोग्य सेवा ही अपुरी पडत असल्याने जिल्हा परिषद सदस्या सौ. विजयाताई बिरादार यांनी या नवीन उपकेंद्राच्या इमारती ची मागणी केली, माजी सरपंच शैलेजा पटवारी यांनी माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत होते. त्यास यश आले आहे. लवकरच ही इमारत गावकऱ्यांच्या व आरोग्य प्रशासनाच्या ताब्यात देणार असल्याची माहिती ठेकेदार पवार यांनी दिली, या वेळी सरपंच भरत कोचेवाड माजी सरपंच प्रतिनिधी माधव पटवारी, गावकरी धनाजी सोनकांबळे, श्रीरंग भालेराव उपस्थित होते.