तरुणांनी विवेक जागृत ठेवून आपले जीवन घडवावे-सेवानिवृत्त प्रा. डॉ.वाय बी गायकवाड यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे) आजच्या बदललेल्या जगामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन तरुण पिढी व परिवारातील सदस्य कृत्रिम आणि भौतिक सुख सुविधांमुळे आळशी व बेशिस्त बनल्याचे
दिसून येत आहे. त्याच्या जीवनाला शिस्त आणि योग्य आकार देण्यासाठी तरुणांनी व परीवारातील सदस्यांनी विज्ञानाचे शस्त्र हाती घेऊन विवेक जागृत ठेवून आपले जीवन
सर्वांगानी विकास घडवावे असे आग्रही प्रतिपादन महात्मा गांधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. वाय बी गायकवाड यांनी केले.अनिस कार्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. वाय बी गायकवाड आजादी के अमृत महोत्सव याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरि केंद्रे यांची तर
प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख उमाकांत स्वामी. मा नगरसेवक शेषराव ससाने, मा नगरसेवक बालाजी आगलावे, हे होते. यावेळी प्रा. डॉ. वाय बी गायकवाड म्हणाले
शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या सहवासातअनेक वर्ष
मी विवेक वाहिनीच्या चळवळीमध्ये सोबत काम केलेला आहे. चळवळ मोठ्या जोमानेत्यांचे कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहेत , जीवनात मोठे व्हायचे असेल तर नियमित वाचन, चिंतन, मनन, विनम्रशीलता, क्षमा क्षिलता आदी गुण मोठे होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या विवेकी चळवळीमध्ये तरुणाने जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन केले. अनिस च्या वतीने प्रा. डॉ. वाय बी गायकवाड व पत्नी शारदा गायकवाड
यांचा चळवळीच्या
योगदानाबद्दल आजादी के अमृत महोत्सवनिमित्य सन्मान करण्यात आला . यावेळ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव मेघराज गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रत्नाकर नळेगावकर यांनी व आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मांनले. या वेळी
जस्ट पत्रकार सुरेशजी डबीर. अजहर बागवान. रामभाऊ तत्तापुरे डॉ. अतुल पागे. इमरोज पटवेकर. रामभाऊ तत्तापुरे. अजहर बागवान. डॉ शीतल गायकवाड.दराडे साहेब संतोष गायकवाड.व आनिस
चे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.