अहमदपूर शहराला एक दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करु: मुख्याधिकारी

अहमदपूर शहराला एक दिवसाआड स्वच्छ पाणीपुरवठा करु: मुख्याधिकारी

अहमदपूर : ( गोविंद काळे ) शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. पूर्वीही होते. परंतू प्रशासनाची दिरंगाई, किंवा नियोजनाअभावी ते झाले नसेल? परंतू आगामी काळात एक दिवसाआड आणि तेही स्वच्छ पाणी शहरातील नागरिकांना पुरवठा करणार असल्याचे अभिवचन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिले.
अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा शहरातील काडवदे गल्लीत शिवसेना उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे व कॉलनीतील नागरिकांच्यावतीने शहराला कर्तृव्यदक्ष अधिकारी लाभले म्हणून त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉलनीतील महिला
कांचन शर्मा, चंदा उपाध्ये, अश्विनी कासनाळे, रेखा ओझा, सुजाता काडवदे, चंद्रकला काडवदे, सुशीला काडवदे, वत्सला काडवदे, नागीनबाई दांडगे, माया घोडके, रुपाली दांडगे, सुनीता बेद्रे, शिवानी बेद्रे, आदी महिला व नागरिकांनी त्यांचा सन्मान केला. व पुढील काळात आपल्या हातून असेच चांगले कार्य होवोत म्हणून शुभेच्छा दिल्या. काकासाहेब डोईफोडे म्हणाले, शहरात ज्या-ज्या ठिकाणी खुली जागा आहे. त्या-त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी व वृध्दांना फेरफटका मारण्यासाठी स्वच्छ, सुंदर गार्डन उपलब्ध करणार आहोत. एवढेच नसून वाकी नदी येथेही सुंदर गार्डन व बोटींगची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. शहरातील रोगराई कमी करण्यासाठी नालीवर मच्छर फवारणी करुन दुर्गंधी कमी करण्यासाठी खास योजना राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जुगल किशोर शर्मा, मुन्ना भुतडा, जुगल ओझा, अशोक जोशी, जाफर शेख, महेश ओझा, सचिन निजवंते, गणेश कासनाळे, दिनेश आरसुडे, रामु शर्मा, सागर वर्मा आदींची उपस्थिती होती.

About The Author