लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली दुसरी विभागाचे नेतृत्व गुण विकास शिबिर संपन्न

लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली दुसरी विभागाचे नेतृत्व गुण विकास शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात, बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण विकसित व्हावेत म्हणून, इयत्ता पहिली दुसरी विभागामध्ये नेतृत्व गुण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून विभाग प्रमुख सुरेखाबाई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे व सौ.जया भुरे उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.जया भुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आहार चांगला असेल तरच आरोग्य चांगले राहील व आपले आरोग्य चांगले राहिले ,तरच आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो.आहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.दुसरे प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी इतरांच्या सुख दु:खात धावून येणारा म्हणजे नेतृत्व करणारा होय.सर्व मंत्र्यांची कामे समजावून सांगितली.अध्यक्षीय समारोपपर भाषणात श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी नेता कसा असावा, याबद्दल खूप छान मार्गदर्शन केले.संपूर्ण शिबिराचे सुत्रसंचलन सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले तर,आभार सौ.अर्चना सुवर्णकार यांनी केले.शिबिर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले

About The Author