विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देऊन आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप
उदगीर (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभर आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. तोंडार येथील नेहरू मेमोरियल हायस्कूल शाळेतील व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनींना स्नेह भोजनाचा आस्वाद ग्राम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बी.एम.बिरादार यांच्या वतीने देण्यात आला. साधारण ४०० विद्यार्थ्यांना हा स्नेह भोजनाचा आस्वाद स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देऊन “आझादी का अमृत महोत्सवाचा समारोप” हा कार्यक्रम पार पाडण्यात आला, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आ. मनोहर पटवारी, उपाध्यक्ष बी.एम. बिरादार, मु.अ एच. बी.जाधव, माधव पाटील, एन.के.कुभांर ,एम.बी.बिरादार, वाय.एन.बिरादार , एस.पी. स्वामी, पि.के. शेटकार,एम.पी दाजी, बी.व्ही पाटील,कोळी , श्रीमती होळकर, श्रीमती चौधरी, निवृत्ती पांचाळ,वामण सुरनर, ज्ञानेश्वर कोचेवाड व ग्राम पंचायत सदस्य मनोहर सोनकांबळे संस्थेचे सदस्य उपस्थित होते.