पोलीस पाल्यासाठी आयोजित “रोजगार मेळाव्यात” 55 पोलीस पाल्यांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

पोलीस पाल्यासाठी आयोजित "रोजगार मेळाव्यात" 55 पोलीस पाल्यांची नोकरीसाठी प्राथमिक निवड

लातूर(एल.पी.उगीले)
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर पोलिस दलाच्या वतीने रोजगाराच्या शोधात असलेली पोलिसांच्या मुलांचा शोध घेण्यात आला. त्यांना गुगलफॉर्मच्या माध्यमातून एक लिंक उपलब्ध करून देऊन त्यामध्ये वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, त्यांचे आवडते क्षेत्र याबाबत माहिती भरण्यास सांगण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्यातर्फे दयानंद शिक्षण संस्था लातूर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पोलिसांची मुलांच्या मुलाखती घेऊन सुमारे 55 जणांना प्राथमिक निवडपत्र देण्यात आले. मुंबई-पुण्यातील तसेच लातूर येथील 08 कंपन्यांनी, तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारे पाच महामंडळानी या मेळाव्यात सहभाग घेतला आणि उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी देण्यात आली. पोलिस विभागातर्फे मुलांना नोकरी मिळवून दिल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
पोलिसी अधीक्षकांचे विशेष प्रयत्न
पोलिसांच्या वतीने गुन्हे नियंत्रण, त्यांची उकल, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे कामच केले जात नाही तर त्यासोबतच पोलिस कुटुंबियांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे लातूर पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. सध्याच्या आधुनिक व यांत्रिक युगात नोकरीच्या संधी फारच कमी झाल्या. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे पोलिसांच्या मुलांना देखील नोकरी मिळवताना अडचणी येत होत्या. ही वस्तुस्थिती ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी रोजगाराच्या शोधात असलेली पोलिसांच्या मुलांचा शोध घेण्यात आला. त्यांना गुगलच्या माध्यमातून एक लिंक उपलब्ध करून देऊन त्यामध्ये वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता, त्यांचे आवडते क्षेत्र याबाबत माहिती भरण्यास सांगण्यात आले. 134 उमेदवारांनी यामध्ये नोंदणी केली. मुलांच्या नोंदणीनुसार पोलिसांच्या वतीने जवळपास 08 कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्यांच्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यास तयारी दर्शवली.
दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयातील हॉल मध्ये मेळावा.-
पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्यातर्फे दयानंद शिक्षण संस्था, लातूर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उदघाटन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर मेळाव्यात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी पोलीस पाल्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर रोजगार मेळाव्यात आलेल्या मुलांच्या या ठिकाणी असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. सुमारे 134 उमेदवारांनी प्रत्यक्षात उपस्थिती दर्शवली. यातील 55 जणांना कंपन्यांकडून नोकरीसाठी प्राथमिक निवड करण्यात आली तर 05 जणांची जागेवरच निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्राचार्य दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील डॉ. शिवाजीराव गायकवाड, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विभाग लातूर चे बालाजी मरे यांची उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षकांनी पोलीस पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल विभाग,लातूरचे श्री.बालाजी मरे, मेळाव्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेले दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, विविध कंपनीचे उपस्थित प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केले
सदर मेळाव्याचे नियोजन, आखणी तसेच विविध कंपन्याशी समन्वय, संपर्कासाठी भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

About The Author