श्यामार्य कन्या विद्यालयात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामार्य कन्या विद्यालयात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी श्यामार्य कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पत्रकार व डॉक्टर धनाजी कुमठेकर, विजय बैले ,सतनाप्पा हुरदळे, वनमाला मुक्कावार, माधव कांबळे मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉक्टर धनाजी कुमठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीमती संगीता देशमुख व विद्यार्थी गीत मंचाद्वारे समूहगीत घेण्यात आले.देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यासाठी लढले. यामध्ये लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, असे डॉ. धनाजी कुमठेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कांचन मोरे आणि मानसी देवनाळे यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. संजना पप्पागिरे ,आर्या जिंदम यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.
महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज ,टागोर, टिळक, गांधी, नेहरू, आंबेडकर (इ.) ही आपल्या संस्कृतीतील देदीप्यमान ‘पानं’ आहेत. असे अध्यक्षीय समारोपातून प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण भोळे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गुरमे, श्रीहरी निडवंचे, विक्रम मलकापूरे ,संजीव पाटील, माणिक कांबळे ,संभाजी कोयले, मदन पाटील, महेश हुलसुरे, सारिका कुलकर्णी, संगीता खादीवाले, संगीता सुतार, वैशाली अणकल्ले, स्वाती मोरतळे, प्रेमा होन्ना यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी ऐनिले यांनी तर आभार शिवरुद्र पाटील यांनी व्यक्त केले.