मतिमंद व मूकबधिर विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन
अहमदपूर( गोविंद काळे ) 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतिमंद विद्यालय व श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
15 ऑगस्ट ह्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतीमंद विद्यालय व श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयात ध्वजारोहण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास तपशाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी रेड्डी लातूर जिल्हा अध्यक्ष ठाकरे गट, रोडगे संतोष संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर, माजी मुख्याध्यापक देवणिकर सर यावेळी उपस्थित होते
यावेळी बालाजी रेड्डी यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की आपण सर्वजण विद्यार्थ्यांचे पालन पोषण शैक्षणिक कलागुणांना वाव देता हे खूप मोलाचे काम आपण करत आहात, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी राहत आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या आहाराची व्यवस्था संस्थाप्रमुखांनी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करतो व मी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो.मतिमंद व मुकबधीर मुलांचे पालक स्वतः तयार नसतात पालन पोषण करण्यासाठी पण आपण सर्व गोष्टी विद्यार्थ्यांकरीता तन मन धनाने कार्य करता ते खूप अनमोल आहे.आपण काम करीत असताना भविष्यात तुम्हाला कसले अडचण आली तर आम्ही आज उद्या कायम तत्पर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा त्यांनी शब्द दिला .
माजी मुख्याध्यापक देवणीकर सर यांनी पण मार्गदर्शन करताना म्हणाले की या मुलांना तुम्ही शैक्षणिक गोष्टी तर देताच पण त्यांना आरोग्य विषयक काळजी कवायती, मैदानी खेळ करुण घेता त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि तो सक्षम बनतो असे यावेळी त्यांनी उद्गार काढले
यावेळी दत्तात्रय बिरादार मुख्याध्यापक, वाडीकर सर , श्रीनिवास सर,चिमले सर ,पाटील सर ,वाघमारे सर, मुळे मॅडम ,ढगे मॅडम, गुड्डा मॅडम, आगलावे सर, बिराजदार सर, म्हेत्रे सर, पराड सर,मेश्राम सर, पाटील सर,बोरोळे सर, शिंदे सर आदींची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीनिवास सर यांनी मानले