एसटी बसची व मालवाहु ट्रकची समोरा समोर जोराची धडक ; 29 ते 3O जण जखमी

एसटी बसची व मालवाहु ट्रकची समोरा समोर जोराची धडक ; 29 ते 3O जण जखमी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील सुनेगाव ( सांगवी ) गावाजवळील नॅशनल हायवेवर एसटी बस आणि मालवाहु ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात 29 ते 30 जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.16) सायंकाळी 5 : 30 वाजेच्या सुमारास घडली असुन यातील 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून जवळपास 12 प्रवाशांना प्रथमोपचार करुन लातूर व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर शहरापासुन जवळपास दहा किलोमिटर अंतररावर असणाऱ्या सुनेगाव ( सांगवी ) गावाजवळील नॅशनल हायवेवर अहमदपूरकडून नांदेडकडे जाणारी एसटी बस एम.एच 24 एयु 8160 तसेच नांदेड येथून लातूरकडे येणारी मालवाहु ट्रक एम.एच 26 डीई 4576 यांची समोरा समोर दोन्ही वाहनांच्या डाव्या बाजूला जोराची धडक झाली ही घटना दि 16 ऑगस्ट रोजी सांयकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली असुन या अपघातात एसटी बसमधील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत त्यातील जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत : – आनंद जाधव (वय ४५ वर्ष, वसमत), नागनाथ बंगावार (वय ५०, मरळक), ज्ञानेश्वर संगवर (वय २५, नांदेड), अजय हाके ( वय ३२, शिरनाळ), खाजा शेख (वय २९, लातूर), सुनील कुकर (वय ४०, तळेगाव घाट, आंबेजोगाई), सावित्राबाई शेळके (वय ५०, धानोरा), बालाजी भिसे (वय २७, दाव्याची वाडी, हादगाव), नितीन मानखंडे (वय ३२, भाटसांगवी), गंगाप्रसाद खंडागळे (वय २९, शिराढोण, कंधार), लताबाई सूर्यवंशी (वय ६०, तळणी), संभाजी घुले (वय ३०, गुत्ती, जळकोट)
अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत : – हनुमंत श्रीमंगले (वय ६०, मरशिवनी), पुनम श्रीमंगले (वय २२, मरशिवनी), शिवराज देशमुख (वय २४, सोनखेड), मीना इबते (वय ४०, नांदेड), गंगाधर वंगलवाड (वय ५०, नांदेड), वैशाली जाधव (वय ४५, हिप्परगा, बिलोली), छाया भालेराव (वय ५९, नांदेड), साहेबराव बामणे (वय २६, नांदेड), लक्ष्मीबाई जाधव (वय ६२, कासारखेडा), विठ्ठलराव कदम (वय ५२, देगाव, अर्धापूर), सुमन लडे (वय ६०, देगाव, अर्धापूर), साक्षी भालेराव (वय १९, नांदेड), दिलीप भालेराव (वय ४५, नांदेड), पूजा कोंडलवाडे (वय २५, धानोरा), लक्ष्मी कदम (वय ६०, देगाव, अर्धापूर), मारुती आढाव (वय ७०, कासारखेडा), असलम शेख (वय २८, शिंदगी खुर्द), रुक्मिणी कदम (वय ६०, देगाव, अर्धापूर)
अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख संतोष बिराजदार हे रात्री उशीरापर्यंत रुग्णालयातच बसुन होते
याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री नऊ वाजेपर्यंत चालु होती
सदरील घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याकर पोलीस निरिक्षक देडे, सहा- पोलीस निरिक्षक पठान तसेच सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थकुमार सुर्यवंशी यांनी घटना स्थळी तात्काळ भेट देऊन जखमींना उपचारासाठी मदत केली

About The Author