पु अहिल्यादेवी विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सांगवी सुनेगाव पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन व आज़ादी का अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली त्यानंतर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर सांगवीचे सरपंच राजेशजी कांबळे,युवा मोर्चाचे सरचिटणीस हेमंत गुट्टे, केंद्रीय मुख्याध्यापक भानुदासराव शिंदे, संस्थेच्या सचिव तथा भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे हाके, संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड मानसी हाके,पु अहिल्यादेवी बी एड काॅलेजचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब आंधळे, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार नरसिंग कोंडेवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील साहेबराव राठोड यांच्यासह असंख्य पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षा, चित्रकला परीक्षा तथा किंग ऑफ वर्डस या परीक्षेतील गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शाळेचा माजी विद्यार्थी डॉ संगमेश्वर बालाजी चव्हाण या विद्यार्थ्यांने बीएएमएस हा वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला आणि जि प केंद्रीय प्राथमिक शाळा व अहिल्यादेवीच्या जवळपास वीस मुलांची भाषणेही याप्रसंगी झाली तर निपूण भारत, बालविवाह प्रतिबंधक बाबतची तथा तंबाखू मुक्तीबाबतची शपथ केंद्रीय मुख्याध्यापक भानुदासराव शिंदे यांनी उपस्थितांना दिली.
तसेच आठवीच्या तनुश्री प्रवीण सुरनर,शिवानी नागनाथ देवकते या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी दिलीपराव देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळेतच खरी गुणवत्ता असून या शाळेत प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची भरभराट होत आहे एकेक विद्यार्थी शिखर गाठत आहे या शाळेने आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले आहे हे निश्चितच अभिमानाची बाब आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शेख जिलानी यांनी केले तर आभार संभाजी दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाराम बुर्ले, राजकुमार पनाळे, कौशल्या देवकते, जनार्दन मासोळे, तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी, अमोल सारोळे, संतोष मुळे, रमेश चेपूरे, अच्युत सुरनर, दैवशाला शिंदे, चिंतन गिरी, गणेश जाधव, संदेश हाके, गायकवाड , शिवाजी सुरनर,कोंडीबा माने,हिदायत शेख,संजय कजेवाड, अनंत उदगीरे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.