साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती भोपणी येथे संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती भोपणी येथे संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा जागर प्रत्येकाच्या घरा घरात पोहचला पाहिजे – निकिता कांबळे

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी तालुक्यातील भोपणी येथे लोकशाहीर साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची १०३ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन लक्ष्मण डोपेवाड सरपंच मा पत्रकार लक्ष्मण रणदिवे, बिट जमादार सय्यद,सुनिल मोतिरावे,रवि मोतिरावे,इंद्रजित मोतिरावे, किसन पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,तसेच ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी जयंती समिती अध्यक्ष सुनील मोतिरावे,उपाध्यक्ष रवि मोतिरावे,अनिल व्यंकटराव मोतिरावे खजिनदार,रामेश्वर मोरे,निकिता कांबळे,अंकिता कांबळे,निलेश कांबळे,सुधाकर मोतिरावे,बालाजी मोतिरावे,महेश मोतिरावे,एकनाथ मोतिरावे,अनिल रामा मोतिरावे,संभाजी मोतिरावे,अशोक मोतिरावे,संजय अंजुरे,दत्ता मोतिरावे,अजय मोतिरावे, तानाजी मोतिरावे, लक्ष्मण मोतिरावे, वैजनाथ मोतिरावे,शकुंतला मोतिरावे, हौशाबाई मोतिरावे, ललिता मोतिरावे, त्रिवण मोतिरावे, रूक्मिणबाई मोतिरावे, केवळबाई मोतिरावे,आदिची उपस्थिती होती, तसेच शाळेतील विद्यार्थीही मनोगत व्यक्त केले होते.

निकिता कांबळे यांनी आण्णासाठे यांच्या कार्यकाळ खडतर जीवन व साहित्य लोकापर्यत पोहचवण्याचे काम केले आहे आजही फकिरा कांदबरी महाराष्ट्राला पहिला बहुमान साहित्याचा माध्यमातून मिळवले आहे अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पवाडे, लोकनाट्य हे कला जिवंत ठेवण्याचे काम फक्त आण्णाभाऊ साठे यांनीच करु शकले आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरा घरात अण्णाभाऊचा विचारांचा जागर गेला पाहिजे,असे सखोल मार्गदर्शन केले व सुत्रसंचलन पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी केले ,आभार इंद्रजित मोतिरावे यांनी मानले.

About The Author