माजी सैनिक व यशस्वी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ज्ञानदिप अकॅडमीत ध्वजारोहन

माजी सैनिक व यशस्वी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ज्ञानदिप अकॅडमीत ध्वजारोहन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील ज्ञानदिप अकॅडमी स्पर्धा परिक्षा केंद्र येथे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी माजी सैनिक तसेच अकॅडमीतील यशस्वी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठा आनंद उत्सव साजरा करून उत्साहात ध्वजारोहन करण्यात आले
भारत मातेच्या सीमेचे रक्षण करून सेवानिवृत्त झालेले सुबेदार शिवजी नलवाड,हवालदार बी एन कराड ,हवालदार शिवराम शिरसाट ,नाईक इप्पर शिवाजी ,नाईक विष्णू जायभाये, शिपाई मुंढे सुभाष तसेच अकॅडमी मधुन पोलीस भरती मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी अर्जुन कसबे मुंबई पोलीस,हनुमंत मुंढे मुंबई पोलीस,जयवंत हरगिले मुंबई पोलीस यांच्या उपस्थितीत माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष नलवाड यांच्या हस्ते ज्ञानदिप अकॅडमी स्पर्धा परिक्षा केंद्र अहमदपूर येथे ध्वजारोहन करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष नलवाड हे होते कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अकॅडमीचे संचालक उध्दव इप्पर म्हणाले की, आत्ता पर्यन्त अकॅडमीतुन हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये ज्ञानाचे धडे दिले जातात त्याच बरोबर माणुसकीचं धडे पण दिले जातात. तसेच प्रत्येक कला गुणांना वाव दिला जातो असे मनोगत व्यक्त केले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्याना विविध विषयावर मार्गदर्शन केले अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी देखिल आपली मनोगते मांडली व विविध प्रकारची चित्तथरारक प्रातिक्षके करून दाखवुन उपस्थितांची मने जिंकली
अध्यक्षीय भाषण करताना नलवाड म्हणाले की, ज्ञानदीप अकॅडमीत खूप चांगले प्रशिक्षण दिले जाते विशेष म्हणजे मुलींसाठी ही अकॅडमी खूप सुरक्षित आहे. फक्त जेवणाची फीस घेऊन येथे प्रशिक्षण दिले जाते. नोकरी लागल्यानंतर कुठलीही अडवणूक केली जात नाही. येवढ्या कमी पैश्यामध्ये चंगल्या सुविधा देऊन खूप मुले व मुली अकॅडमीत शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी विवेक घाटीवाले, पत्रकार भीमराव कांबळे प्रा. राहुल ढवळे, प्रा संदीप मुसळे, प्रा. मधुकर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती
सूत्रसंचलन चिमणराव कावले यांनी केले तर आभार प्रा. अमोल वाघमारे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे प्रशिक्षण अधिकारी नितीन गुट्टे, राम मेजर, जितेन्द्र मेजर , महिला प्रशिक्षक अर्चना करपे, ऋतुजा बनकर, नरोटे आदींनी सहकार्य केले.

About The Author