अहमदपूर-चाकुर तालुक्यात मध्य हंगाम विमा लागू करावा – आ. बाबासाहेब पाटील यांची मागणी.

अहमदपूर-चाकुर तालुक्यात मध्य हंगाम विमा लागू करावा - आ. बाबासाहेब पाटील यांची मागणी.

अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर- चाकुर तालुक्यात तब्बल एक महिन्यापासुन पावसाने खंड दिला असुन पिके सुकुन जात आहेत त्यामुळे मध्य हंगाम विमा लागु करावा या मागणीचे निवेदन मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी लातुर जिल्हाधिकारी यांना दिले आहे
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाने खंड दिला आहे. त्यामुळे पिके सुकून जात आहेत, तरी अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळात मध्य हंगाम विमा लागू करण्याच्या मागणीचे निवेदन आ. बाबासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सलग 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाने खंड दिला तर मध्य हंगाम पीक विमा लागू करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना असतो. असे या निवेदनात आ. बाबासाहेब पाटील यांनी नमूद केले आहे.
आमदार यांनी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नव्याने रुजू झालेल्या श्रीमती वर्षाताई ठाकूर – घुगे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंतराव जाधव, येलादेवी उमरगा चेअरमन राजकुमार सोमवंशी, मनोज पाटील आदींची उपस्थिती होती.

About The Author