बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बालाघाटच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
यामध्ये इलेक्ट्रिशियन प्रथम वर्ष अजय केंद्रे 90.33% गुण घेऊन प्रथम तर अमर सोमवंशी 87.67% गुण घेऊन दुतीय व विठ्ठल शेंडगे 85.83% तृतीय आला आहे. वायरमन विभागातून प्रथम वर्षात धोंडीराम मुकनर 82.33% गुण घेऊन प्रथम, गुंडेराव देवकते 80.50% गुण घेऊन द्वितीय तर रामेश्वर कुंभारे 79.50% गुण घेऊन तृतीय कोपा विभागामधून ऋषिकेश राठोड 87.67% गुण घेऊन प्रथम तर रोकडोबा मसुरे 86.00% गुण घेऊन द्वितीय विजयकुमार जाधव 84.67% गुण घेऊन तृतीय वेल्डर विभागामधून माऊली थावरे 74.00% गुण घेऊन प्रथम अभय चव्हाण 71.83% गुण घेऊन द्वितीय आला आहे.
द्वितीय वर्ष इलेक्ट्रिशियन मधून शैलेश बरुळे 95.83% गुण घेऊन प्रथम तर शंकर कोपनर 93.83 गुण घेऊन दुतीय निखिल केंद्रे 93.17% गुण घेऊन तृतीय आला आहे. वायरमन विभागातून वैभव मद्दे 88.00% गुण घेऊन प्रथम, अभिषेक कोपनर 85.67%गुण घेऊन द्वितीय शिवशंकर उप्परवाड 81.67% गुण घेऊन तृतीय आला आहे.
या परीक्षेमध्ये बालाघाट आयटीआय चे एकूण 130 विद्यार्थी बसले होते यामध्ये 90% पेक्षा अधिक गुण घेऊन 06 विद्यार्थी उत्तीर्ण तर 80 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 70 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व सर्व निदेशक व इतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच संस्था सचिव रेखाताई तरडे मॅडम, कोषाध्यक्ष अमरदीप हाके, प्राचार्य मदन आरदवाड, निदेशक श्रीराम कागणे, निदेशक बालाजी लवटे, निदेशक मंगेश चव्हाण, तसेच सर्व कर्मचाऱ्याकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.