पत्रकार संरक्षण कायद्याची होळी ;पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा निषेध
उदगीर (एल .पी.उगीले)
पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला.मात्र राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ उदगीरातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतिने तहसिल कार्यालया समोर पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतीची होळी करुण निदर्शने करत तसिलदार रामेश्वर गोरे यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा (जि.जळगाव ) येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांना दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र येत राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात आली.
यावेळी विनायक चाकुरे , अर्जुन जाधव, सचिन शिवशेट्टे, श्रीनिवास सोनी, बिभीषन मद्देवाड , रवींद्र हसरगुंडे, संतोष जोशी, सिद्धार्थ सूर्यवंशी, महादेव आनवले, बबन कांबळे, सुनील हावा, बस्वेश्वर डावळे, महेश मठपती , मंगेश सूर्यवंशी, संदीप निडवदे , संगम पटवारी , विश्वनाथ गायकवाड, महादेव घोणे,निलेश हिप्पळगावकर , जय मादळे, अझरुद्दीन शेख, सुधाकर नाईक, गणेश मुंडे,आदी पत्रकार सहभागी होते.