किणी ( य ) येथे कृषिकन्यानी विविध सामाजिक उपक्रम राबविले

किणी ( य ) येथे कृषिकन्यानी विविध सामाजिक उपक्रम राबविले

उदगीर (प्रतिनिधी) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालय , डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे बी.एससी. कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी मौजे किणी (य.) येथे “ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कृषी औद्योगिक संलग्नता” २०२३-२४ अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले.
किणी नगरीचे सरपंच संतोष बिराजदार , उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर , ग्रामसेवक निलेवाड, तलाठी जानतीने , पोलीस पाटील ज्ञानेश्वर नारगुडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बालाजी बिरादार,ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत , कृषीकन्यांनी वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरित्या राबविला .
याप्रसंगी , “मेरी माटी मेरा देश” अभियानांतर्गत गाव परिसरातील माती कलशामध्ये भरून गावामधून घोषणांच्या गर्जनासह , जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले . सदरील उपक्रम राबवण्यासाठी किणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व्यंकट मोतीराव कुंडगीर व समस्त शिक्षक सहकाऱ्यांनी सक्रिय योगदान दिले.
त्याचबरोबर , भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे भूमातेसाठीचे कर्तत्व व योगदान या विषयावर , शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यासमयी , यंदाच्या अग्नीवीर म्हणून निवड झालेल्या कार्तिकेश मुळेचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर , महाराष्ट्र राज्य नशा मुक्ती मंडळ, लातूर जिल्ह्याचे संघटक डॉ.विष्णू कांबळे यांच्या सहकार्याने , नशाबंदीवरील विविध घोषवाक्यांची फलके घेऊन गावामध्ये प्रभात फेरी काढली.
या सर्व उपक्रमांचे नियोजन व आयोजन कृषीकन्या विद्या सरडे, वैष्णवी सोनवणे, स्नेहल पाटील, भाग्यश्री मुंडे, निकिता पाटील, रायला, श्रेया चौधरी यांनी केले . यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी, कार्यक्रम समन्वय डॉ. दिपाली कोकाटे , कार्यक्रम अधिकारी प्रा. शितल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले . सदरील उपक्रम गावातील समस्त प्रतिष्ठित नागरिक , शेतकरी , महिला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .

About The Author