वीरशैव लिंगायत समाजाचा 24 सप्टेंबर रोजी उदगीर येथे राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा
उदगीर (एल.पी.उगीले) : लिंगायत महासंघ, शाखा उदगीरच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत समाजाचा रविवार दि.24 सप्टेंबर 2023 रोजी पाचवा राज्यव्यापी वधूवर परिचय मेळावा शिवपार्वती मंगल कार्यालय, बिदर रोड उदगीर येथे आयोजित करण्यात आला असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
उपवर-उपवधू व पालकांचा वधूवर स्थळ संशोधनार्थ वाया जाणारा वेळ व पैसा वाचावा. शेकडो वधू-वरांना एकाच ठिकाणी स्थळ पाहता यावीत. त्यातून मनपसंद जोडीदार निवडता यावा, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उदगीर शहरातील पाचवा वधू-वर मेळावा आहे. गेली चारही वधूवर मेळाव्याला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणातून वधू-वर आले होते. याही वेळेला असाच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासाठी वधूवरांच्या नावनोंदणीचा शुभारंभ प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते करण्यात आला. ही नावं नोंदणी सिरसे अक्वा, नवा मोंढा उदगीर येथे करावी.संपर्कासाठी 9767806951,9850247157,8317224724,या नंबरवर संपर्क करावा .उदगीर येथे होणारा हा वधू-वर मेळावा राज्यव्यापी असल्याने त्याची जय्यत तयारी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी तसेच लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील व उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, जिल्हा उपाध्यक्ष बस्वराज ब्याळे, कोषाध्यक्ष भिमाशंकर शेळके, तालुका पदाधिकारी संजय शिवशेट्टे, प्रा.पंडीत देवशेट्टे, राजकुमार वडले, संगशेट्टी बिरादार, प्रा.महेश धोंडीहिप्परगेकर, प्रा.प्रकाश करीअप्पा, उमाकांत द्याडे, बापुराव शेटकार, अशोक तोंडारे, संतोष खरोबे, रेवणप्पा बारोळे, विद्याकांत अंबेसंगे, बस्वराज विश्वनाथे, शिवराज रंडाळे आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.