उदगीर रोटरीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गटसाधन केंद्र देवणी येथे रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देवणी व परिसरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ज्यामध्ये स्कूल बॅग, वाटर बॉटल, लंच बॉक्स, कंपास पेटी आणि ड्रॉइंग बुक आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ४० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
देवणी येथील गटशिक्षणाधकरी संजय शिंधाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी शिरीष रोडगे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी, कोषाध्यक्ष ज्योती चौधरी, प्रोजेक्टचेअरमन विजयकुमार पारसेवार, संतोष फुलारी, विशाल जैन, प्रमोद शेटकार, रविंद्र हसरगुंडे, व्यंकटराव कणसे, डॉ. सुधीर जाधव, सायली पारसेवार, निनाद चौधरी, गट साधन केंद्र गट समन्वयक सदाशिव साबणे, केंद्रप्रमुख पांडुरंग यलमटे, विषय साधन व्यक्ती राजेंद्र वजनम, प्रवीण डोईजोडे, राजकुमार जाधव, बाळासाहेब घाटे, आबासाहेब भद्रे सह विष्णूमोरे, आनंद बिरादार, युसुफ शेख, मिनाज सिद्दीकी, एन. एन. दायमी, मुशीर दायमी, यास्मिन शेख, एकनाथ यमगर, दीपक बोडके आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर. पी. जाधव यांनी केले. आभार श्री रोडगे यांनी मानले.