हंडरगुळी येथे जागोजागी साचलेले घाण पाण्याचे डबके करतेय पायधुणी !!
सहा कोटी गेले कुठे ?
हंडरगुळी (विठ्ठल पाटील) : कांही महिण्यापुर्वी ग्रामविकासासाठी सहा कोटी रुपये विविध योजनेतून दिल्याचे ना. संजय बनसोडे यांनी हंडरगुळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो जनतेच्या समक्ष सांगितले होते.मात्र आज गावाअंतर्गत विविध गैरसोई व समस्यांकडे व जागोजागी साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्याकडे पाहता सहा कोटी गेले कुठे ?असा सवाल हंडरगुळीकर उपस्थित करतात.कारण सहा कोटींचा फंड आला होता व त्या फंडातुन कामे केली असती तर स्वच्छ,सुंदर व विकास कामांमध्ये हे गाव देशातील “टाॅप टेन” मध्ये आले असते.पण येथील ग्रा.पं.कार्यालया समोरुन शाळा,ज्यू.काॅलेज मध्ये पे – जा करणा-या विद्यार्थ्यांना मुतारीच्या घाणपाण्यातुन “पायधुणी” करत ये-जा करावे लागतेय ! तसेच अनेक गल्यांमध्ये घाण पाण्याचे जागोजागी डबके साचले असुन सर्व जनतेला या दुर्गंधीयुक्त पाण्यातुनच पायधुणी करत ये-जा करावे लागते.ग्रा.पं.च्या या “पायधुणी” नावाचा नवा “यज्ञ” कधी थांबणार ? व गाव स्वच्छ व सुंदर तसेच रस्ते खड्डेमुक्त होणार कधी ? लवकरच जागोजागचे डबके मुरुम वैगेरे टाकुन बुजवणार आहोत.अशी माहिती सरपंच विजयकुमार अंबेकर यांनी दिली आहे.तर माझ्या हाॅटेल समोर साचलेल्या घाण पाण्या – च्या डबक्यातुन ये-जा करताना मुलींसह कांहीजण डबक्यात पडणार होते.अशी माहिती रमेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.यामुळे त्या सहा कोटींच्या कामांचे काय झाले.? कुठे व कुणाच्या घशात गेले ६ कोटी?याचा शोध ना.संजय बनसोडे हे घेतील का?असे प्रश्न शंकर शेळके(माजी सदस्य पं.स.)धनंजय काळ – वणे (माजी संचालक बाजार समिती} विष्णू धूप्पे,के.पी.शेटकार,राजू कोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले आहेत.