संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमी निमित्त सापांविषयी जनजागृती करण्यात आली
अहमदपूर ( गोविंद काळे )येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात नागपंचमीनिमित्त वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी,लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुपच्या वतीने सापाबद्दल चे समज – गैरसमज सांगून जनजागृती करण्यात आली. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.तसेच आपल्या भागात प्रामुख्याने चार विषारी जातीचे साप आढळतात त्यात. नाग,मण्यार, फुरसे, घोणस व बिनविषारी मध्ये तस्कर, गवत्या, रुका,कवड्या, धामण, दिवड, कुकरी, डूरक्या घोणस,वाळा, नाणेटी,हे साप बिनविषारी आहेत. पण सापा बद्दल काही समज आणि गैरसमज आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे.साप चावल्याने माणूस मरत नाही तर साप चावला या भीतीने माणूस दगावू शकतो.आपल्याला सापाचा दंश झाला तरच विषबाधा होऊ शकते.
सर्पदंश झाल्यास काय करावे.सर्पदंश हा एक प्रकारचा अपघात आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला सर्पदंश झाला आहे त्या व्यक्तीला मानसिक आधार देणे आवश्यक असते. सर्प दंश झालेली जखम वाहत्या पाण्यात किंवा नळाखाली स्वच्छ धुवावी शक्य तेवढे जखमेतून रक्त काढून टाकावे.तसेच आवळपट्टी बांधाताना हाताला सर्पदंश झाला असेल तर दंडाला व पायाला सर्पदंश झाला असेल तर मांडीला आवळपट्टी बांधावी आवळपट्टी साठी रुमाल, ओढणी, दोरीचा तुकडा आदीचा उपयोग करावा.आवळपट्टी प्रत्येक 10 मिनिटांनी 1 मिनिटासाठी पूर्ण सोडावी व परत बांधावी असे करत त्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे.सर्पदंश झालेल्या व्यक्ती ने जास्त चालू व जास्त बोलू नये.
त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते व विष संपूर्ण शरीरात लवकर पसरू शकते.
साप दूध पितो.नागाला मारल्यास नागिण बदला घेते.साप धनाचे रक्षण करतो.हे सापाबद्दलचे गैरसमज आहेत.
सर्पदंशावर प्रभावी औषध म्हणजे ‘प्रतिसर्पविष’ (anti-snake venom) ही लस प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध असते.सापाला
मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आंनद आहे.या विचाराला सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करूया अशी माहिती सर्पमित्र सुदर्शन पाटील, अमोल शिरूरकर, नागेश वरवटे, गोरख खेडकर, दत्ता कोंपलवाड, सिद्धार्थ काळे, यांनी दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्नांचे,शंकांचे निरसनही केले.यावेळी या सर्पमित्रांसह प्राथमिक मुख्याध्यापक आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर, सतीश साबणे, ज्ञानेश्वर चव्हाण, भानूदास माने, मंगेश शिवणखेडे, बब्रुवान कलाले सह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज मोरे यांनी केले तर आभार संगीता आबंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘मी भारतीय आहे’ या गीताने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु, पक्षी,प्राणी आढळून आल्यास त्वरित सर्पमित्राशी संपर्क करावा. असे आवाहन सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी केले.