उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करा – प्रहार पक्षाची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर व जळकोट तालुक्यातील सामान्य जनतेचे संसार उध्वस्त करणाऱ्या अवैध धंदे विषयी उदगीर व जळकोट शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. उदगीर व जळकोट तालुक्यातील संबंधित पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात प्रामुख्याने मटका, जुगार, अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू, राशन कळया बाजारात विकणे, अवैध वाहतूक, ऑनलाईन लाॅटरी, वेश्याव्यवसाय ,अवैध वाळू , अवैध गौनखनीज,अवैध धंदे , मोठ्या जोरात सुरू आहेत. यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात चोरी, डाके, मारहाण, महिलांची छेडछाड, कुटुंबिक कलह, गावातील भांडणे,आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उदगीर व जळकोट तालुक्यात शांतता भंग पावली आहे. यासंदर्भात उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे चालविणाऱ्यावर आपल्या स्तरावरून कारवाई करून संबंधित पोलीस अधिकारी यांना आदेशित करावे, तसेच प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने वरील विषय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री यांना लवकरच भेटून निवेदन देणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. प्रशासनाने आपल्या स्तरावरून त्वरित अवैध धंदे तात्काळ बंद करून पोलीस प्रशासनाश आदेशीत करावे, व यासाठी संबंधित अवैध धंदे वाल्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकारी यांचीही संखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाढत्या अवैध धंद्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर पुंगी वाजवा आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांना देण्यात आले, या वेळी प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, जिल्हा प्रवक्तते बंडेपा पडसलगे, उदगीर तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुदे, शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे, ता.कार्याध्यक्ष महादेव आपटे, सचिव अविनाश शिंदे, शहर कार्याध्यक्ष शहाजान शेख, संघटक सोपान राजे, चिटणीस बळीराम चौधरी, उपाध्यक्ष संदीप पवार,शहर संघटक मधुकर गायकवाड, तालुका संघटक चंद्रशेखर बिरादार व इतर प्रहार सेवक यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले.