मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपला विसर
औसा (प्रतिनिधी) : तालुका शिवसेनेची आढावा बैठक लातूर जिल्हा संपर्कप्रमुख बालाजीराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शासन आपल्या दारी ही योजना प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला. आढावा बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली, यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपवर नाराजी व्यक्त केली. आज पर्यंत सर्व समित्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, संजय गांधी निराधार समिती, रो.ह.यो. समितीवर नियुक्ती करतांना भाजपने शिवसेनेला डावलण्यात आले आहे,अशी खंत व्यक्त केली.तसेच आज पर्यंत एकही कामाची शिफारस घेतली जात नाही. परंतु दबाव तंत्राचा वापर करून औसा तालुक्यातील शिवसेना मोडीत काढण्याचे काम भाजप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापुढाकारातून महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. याचा औसा तालुक्यातील भाजपला विसर पडलेला दिसतोय, औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. लवकरच शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. असे संपर्कप्रमुख बालाजी काकडे यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मेहनत करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी बालाजी काकडे यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.