नागेंद्र भारती यांच्या पुण्यतिथी सह श्रावणातल्या बेलाच्या लाखोळीची समाप्ती

नागेंद्र भारती यांच्या पुण्यतिथी सह श्रावणातल्या बेलाच्या लाखोळीची समाप्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : अक्कलकोट च्या स्वामी समर्थांचे गुरू नागेंद्र भारती यांची पुण्यतिथी व श्रावण महिन्यातील बेलाच्या लाखोळीची समाप्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अहमदपूर शहरातील पुरातन काळी असलेल्या नागेंद्र भारती मठ संस्थान मध्ये अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांनी नागेंद्र भारती यांचे शिष्य म्हणून अनेक दिवस वास्तव्यास होते. नागेंद्र भारती महाराजांची पुण्यतिथी व श्रावण महिन्यातील एक लाख बेलाची पाणे वाहण्यात आली आज त्याची समाप्ती व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी सभापती अशोक काका केंद्रे,पोलीस उप अधीक्षक मणिष कल्याणकर, तहसीलदार शिवाजी पालेपाड, पोलीस निरीक्षक सुधाकर देडे,गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोहीफोडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांच्या हस्ते विधीवत पुजा करून महाआरती करण्यात आली.

यावेळी मठाधिपती रमेश भारती,सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर,शाखा अभियंता गोविंद भोसले,कुलदीप हाके,राजकुमार खंदाडे, अॅड. किशोर कोरे, अॅड. अजिंक्य चामे ,अभियंता गणेश पुरी,गणेश हालसे, यशवंत देशमुख, हणमंत गिरी हे उपस्थित होते.
यावेळी शहरातील व परिसरातील हजारो महिला, पुरुष, बाल गोपाळ उपस्थित होते.उपस्थीत सर्व मान्यवरांचे आभार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी गिरी, बालाजी गिरी, संजय भारती, सुरेश गिरी, शंभुदेव भारती, सुमिर भारती, चंचल भारती, विष्णू पुरी, सुभाष पुरी, यांच्या सह अनेकांनी परीश्रम घेतले.

About The Author