बिघडलेली समाजव्यवस्था सुधारण्याची जबाबदारी शिक्षकांची – उचेकर
उदगीर (प्रतिनिधी) : समाजव्यवस्थेतून सर्व घटकांमध्ये दोष निर्माण झाले आहेत. हे दोष दूर करून आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील प्रसिध्द विचारवंत डॉ. माधव पाटील उचेकर यांनी केले. उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शिक्षकांना राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार सोहळा रघुकूल मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा म्हणून प्रा. मंगला विश्वनाथे यांनी तर सचिव म्हणून सरस्वती चौधरी यांनी पदभार घेतला. याच कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांचाही पदग्रहण सोहळा पार पडला. अध्यक्ष म्हणून तेजस अंबेसंगे यांनी तर सचिव म्हणून शशांत चौधरी यांनी पदभार घेतला. व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून रोटरी क्लबचे २०२५-२६ चे नियोजित प्रांतपाल सुधीर लातूरे, विद्यमान सहा. प्रांतपाल शशिकांत मोरलावार, रोटरॅक्ट क्लबचे डीआरआर रवी बक्कड यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. उचेकर यांनी, रोटरी क्लबला मोठा इतिहास असल्याचे सांगत रोटरी क्लबने सामजिक मूल्य रूजविण्याचे काम आजतागायत करीत असल्याचे सांगून समाजसेवा, राष्ट्रसेवा व मानवसेवा यासाठीच रोटरी क्लब काम करीत असल्याचा उल्लेखही यावेळी डॉ. माधव पाटील उचेकर यांनी यावेळी केला. याप्रसंगी रोटरी क्लबच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या रोटरी टाईम्स या मासिकाचे व फोर वे टेस्ट स्टिकरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात रोटरी क्लबचे सदस्य जगदीशप्रसाद बाहेती, रविंद्र हसरगुंडे, विजयकुमार पारसेवार व नागेश अंबेगावे यांची विविध संस्थांवर निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ वर निवड झालेल्या उदगीर रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे माजी सचिव व्ही. एस. कणसे यांनी मागील वर्षीचा आढावा सादर केला. तर नुतन अध्यक्षा प्रा. मंगला विश्वनाथे यांनी पुढील वर्षभरात घेण्यात येणार असलेल्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल जैन व डॉ. सुलोचना येरोळकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन नुतन सचिव सरस्वती चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष किशोर पंदीलवार, संतोष फुलारी, सुयश बिरादार, विशाल तोंडचिरकर, प्रशांत मांगुळकर, महानंदा सोनटक्के, सुनीता मदनूरे, अँड. विक्रम संकाये, डॉ. सुधीर जाधव, भागवत केंद्रे, मल्लिकार्जुन चिल्लरगे, विद्या पांढरे, अनिल मुळे, रामदास जळकोटे, चंद्रकांत ममदापुरे, गोपाल मुक्कावार, लक्ष्मीकांत चिकटवार, कमलेश पेठे, डॉ. संतोष पांचाळ, डॉ. विजयकुमार केंद्रे, बिपीन पाटील सह पदाधिकारी, सदस्य व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.