उदगीर नगरपरिषद द्वारे दिव्यांग नागरिकांची नोंदणी शिबीर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : शासनाद्वारे होणाऱ्या “दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगाच्या दारी” या अभियानाच्या अनुषंगाने उदगीर नगरपरिषद द्वारे शहरातील दिव्यांग बांधवांची नोंदणी ही अर्ज भरून घेवून तसेच समाजकल्याण विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन देखील करण्यात आले. या अभियानात उदगीर शहरातील सर्वच दिव्यांग बांधवांनी सहभाग घ्यावा, व त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा आणि एक ही दिव्यांग बांधव वंचित राहू नये. या विषयी विशेष काळजी घेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातील काही दिव्यांग बांधव उपस्थित होते. आपली सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी त्यांची देखील नोंदणी करून घेणे बाबत संबंधितांना सूचना केल्या.उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी मार्गदर्शन करत नाव नोंदणी करत, सर्व आवश्यक कागदपत्रंसह सोबत ठेवावी आणि जिल्हा मुख्यालय येथे होणाऱ्या शासना कडून दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमास उपस्थिती राहावे, व शासकीय योजनांचा लाभ घेणे तसेच ज्या दिव्यांग बांधवांची नोंदणी बाकी आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी नगरपरिषद दिव्यांग विभाग प्रमुख योगिता पाटील, प्रशासकीय अधिकारी सलीम उस्ताद, भांडार विभाग प्रमुख संदीप कानमंदे, नोंदणी साठी योगीराज भालेराव, रोहित गायकवाड, लखन शिंदे, सय्यद अवेज, सिद्धार्थ गायकवाड कर्मचारी तर प्रहारच्या ग्रामीण जिल्हाप्रमुख कांचन भोसगे, उपजिल्हाप्रमुख प्रेमलता भंडे, उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, उपाध्यक्ष श्रीदेवी बिरादार, सरचिटणीस लता कोळी, चिटणीस कुमुदिनी पांचाळ यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिव्यांग विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी मानले.