संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली. विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी कोकणे निवेदिता, सचिव- दराडे अंकिता, क्रीडामंत्री- कोणापुरे वेदांत, कोषाध्यक्ष- लांडगे श्रुती, सांस्कृतिक मंत्री- तिगोटे शंतनु,सहल मंत्री- जंगाप्पले सुयोग, आरोग्य मंत्री- दैठणकर संस्कृती, पर्यावरण मंत्री- हांडे निवृत्ती, शिक्षण मंत्री- भगत वैष्णवी, संघटन मंत्री- कांबळे धनश्री, शिस्त मंत्री- मेकले इशिका, यांची लोकशाही पद्धतीने निवड करून प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या कार्याची जाणीव करून दिली. विद्यार्थी संस्थेच्या पदाधिकाऱ्याचा संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील व संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा अँड.मानसी हाके, इन्नर व्हील क्लब च्या अध्यक्षा शितल मालू,योग शिक्षिका कलावती भातांब्रे, मुख्याध्यापक मीना तोवर, मुख्याध्यापक आशा रोडगे, करिष्माताई गुरफळे ,नवनाथ हांडे सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संसदेच्या अध्यक्ष व सर्व मंत्र्यांना शपथ घेतली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुजाता बुरगे, जांभळदरे अर्चना, संगीता आबंदे, चव्हाण ज्ञानेश्वर, मोरे युवराज व दिंडे भास्कर या सरांनी परिश्रम घेतले. यावेळी करिष्माताई गुरफळे,नवनाथ हांडे सह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मीना तोवर यांनी केले.सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार शबाना शेख यांनी मानले.

About The Author