अनिशा घोडके विद्यापीठात तृतीय आल्याबद्दल शिवाजी महाविद्यालयात सत्कार
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाची एम एस्सी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अनिशा गोपाळकृष्ण घोडके विद्यापीठातून तृतीय आलेली आहे. या विद्यार्थिनीने एम एस्सी वनस्पती शास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून 92 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी 2023 या वर्षी घेतलेल्या परीक्षेत तिने हे नामांकन प्राप्त केलेले आहे . विशेष म्हणजे ही विद्यार्थिनी बीएस्सी याच महाविद्यालयातून चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहे. सदरील विद्यार्थिनी अतिशय शिस्तप्रिय व अभ्यासामध्ये नैपुण्य प्राप्त करणारी असल्यामुळेच तिला हे यश संपादन करता आले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ . अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सदरील विद्यार्थिनीला वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर पी बिरादार ,डॉ.एस व्ही चाटे, डॉ डी पी पाटील, डॉ एम ए पाटेकर यांनी मार्गदर्शन केले . या विद्यार्थिनीचे अभिनंदन प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी ,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी केले.