महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)- येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त पदवीत्तर संशोधन केंद्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र, उदगीर शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके होते. मंचावर प्रमुख पाहुणे बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल टोगारे, शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले, श्री.हावगीस्वामी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, बँकव्यवस्थापक प्रियंका शिंदे यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे संयोजन विभाग प्रमुख प्रा. डॉ. बळीराम भुक्तरे, प्रा.डॉ.व्ही.पी,चनाळे, डॉ.पी.व्ही.काळे, प्रा.प्रवीण जाहुरे यांनी केले होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक पठाण सानिया सय्यद, द्वितीय मुळे सुप्रिया सूर्यकांत आणि पांचाळ मोहिनी कृष्णा, तृतीय गीता राजकुमार आणि करुणा भदाडे, उत्तेजनार्थ चौधरी राज पटेल, आयशा अश्फाक आणि कसबे संध्या संजय विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एम.ए.हिंदी परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी कलावती लाटे यांचा श्री.तिरुके यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सर्वच मान्यवरांनी हिंदी भाषेच्या योगदानाबद्दल गौरवपूर्ण उल्लेख केला. सूत्रसंचालन गीता खिंडे ,राहुल चव्हाण यांनी केले. यावेळी प्रयास भितीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले, आभार कपिल गायकवाड यांनी मानले.

About The Author