तलवार व एअरगन बाळगणाऱ्या युवका विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल.

तलवार व एअरगन बाळगणाऱ्या युवका विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल.

लातूर (एल.पी.उगीले) आपण काहीतरी फार वेगळे आहोत, आपला वचक निर्माण झाला पाहिजे. असा विचाराने तलवार व एअरगन बाळगणाऱ्या युवकांच्या विरुद्ध लातूर पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध शस्त्रांचे संबंधाने माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर प्रभारी अधिकाऱ्याकडून पथक तयार करुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येत आहे.याचसंबंधाने माहिती काढत असताना विवेकानंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाला दिनांक 21/09/2023 रोजी गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत पाच नंबर चौक बार्शी रोड परिसरात एक व्यक्ती लोखंडी तलवार व एक एअरगन बाळगून आहे.अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने सदरची माहिती पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांना कळवून त्यांच्या नेतृत्वातील पथकाला सोबत घेऊन तात्काळ सदर ठिकाणी तलवार व एअरगन बाळगून असलेला युवक नामे निलेश सत्यवान मादळे, (वय 32 वर्ष, राहणार खंडेराया हॉटेलच्या पाठीमागे, पाच नंबर चौक, बार्शी रोड, लातूर) याला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एक लोखंडी तलवार व एअर गन जप्त करण्यात आली. सदर युवक निलेश सत्यवान मादळे याचेवर पोलीस ठाणे एमआयडीसी येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात व विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाड, डोके, पोलिस अमलदार संजय फुलारी, बाळू भोसले, तसेच विवेकानंद चौक पोलीस ठाणे चे नवप्रविष्ट पोलिस अमलदार यांनी केली आहे.

About The Author