सोयाबीन संशोधन केंद्र, देवणी वळू संगोपन केंद्र लातुर येथेच करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी

सोयाबीन संशोधन केंद्र, देवणी वळू संगोपन केंद्र लातुर येथेच करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी

अहमदपुर (गोविंद काळे) : सोयाबीन संशोधन केंद्र व देवणी वळू संगोपन केंद्र लातुर येथेच करण्यात यावे अन्यथा लातुर जिल्हात आंदोलनाचा वणवा पेटवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी,सभापती मंचकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. याची तात्काळ दखल घेऊन दोन्ही केंद्र लातुर जिल्हात करा अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला.

लातुर जिल्हा हा सोयाबीन पिक घेणारा देशातील दोन नंबरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, म्हणून गेल्या अनेक वर्षापासून लातुर जिल्हा सर्वाधिक सोयाबीन पिकवण्याचे केंद्र ठरले आहे. येथील बाजार भाव देश भरात सर्वात अधिक असतात सोयाबीनवर विविध प्रकारचे संशोधन करुन शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते. इतर जिल्ह्यांच्या मानाने सोयाबीन पिकाला लागणारे हवामान, पाऊस, वातावरण पोषक आहे. दरवर्षी जवळपास सहा लाख हेक्टर मध्ये सोयाबीन पेरणी केली जाते. सोयाबीन पिकावर प्रक्रिया उद्योग करणारे लहान मोठे उद्योग असल्यामुळे येथील सर्व व्यवहार सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत. यापूर्वीच्या सरकार मध्ये कृषीमंत्री यांनी हे संशोधन केंद्र लातुर येथेच व्हावे अशी अपेक्षा सोयाबीन परिषदेत व्यक्त केली होती. परंतु सध्याच्या संभाजीनगर मधिल राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत सोयाबीन संशोधन केंद्र परळी येथे हलविण्याचा घाट घातला आहे. लातुर जिल्ह्यातील व्यापारी, हमाल, गुमस्ता, शेतकरी वर्गाला याचा चांगलाच धक्का बसला आहे. त्याच प्रकारे देवणी वळू संगोपन केंद्र लातुर जिल्हातून अंबेजोगाई येथे हलविण्याचा प्रकार युतीचे सरकार करत आहे. लातुर जिल्ह्यातील देवणी वळू भारत देशात प्रसिद्ध आहे. लातुर सोडून बिड जिल्ह्यात हे संगोपन केंद्र गेले तर देवणी येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. स्वताच्या स्वार्थासाठी हे दोन्ही केंद्र परळी व अंबेजोगाई येथे हलविण्याचा घाणेरडा प्रकार कृषीमंत्री धनंजय मुंडे हे करत आहेत अशी जळजळीत टीका शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केली. दोन्ही केंद्र लातुर जिल्हातच झाले पाहिजेत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, संचालक चंद्रकांत मद्दे, शिवाजी खांडेकर,प्रा. संतोष रोडगे, माधव पवार, धनराज पाटील, शिवाजी पाटील,रामदास कदम, बालाजी कातकडे, सतिश नवटक्के, नारायण नागमोडे, यशवंत केंद्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, नगरसेवक संदीप चौधरी,उपतालुका प्रमुख तथा मराठवाडा गुमस्ता संघटनेचे सह सेक्रेटरी अनिकेत फुलारी, उपतालुका प्रमुख लहू बारवाड, दत्ता हेंगणे, संतोष आदटराव, सहसचिव पद्माकर पेंढारकर,विभाग प्रमुख गणेश माणे, माऊली देवकत्ते,श्रीकांत मुंढे, उपशहरप्रमुख शिवा भारती, बसवेश्वर शिलगिरे, निळकंठ परतवाघ, नामदेव कोणे, सुधाकर बालवाड, मुन्ना शेख, गणेश चव्हाण, एकनाथ राठोड, कालिदास धुळगुंडे, अशोक राठोड, विठ्ठल चिडगीर, दिलीप राठोड, नवनाथ राठोड, सतिश राठोड,सखाराम राठोड, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, युवा सेनेचे तालुका चिटणीस अजय सुरनर मनोहर मुंढे, गजानन येन्ने,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डी.के.जाधव, अनिल मेनकुदळे, धनंजय गुट्टे, संतोष कोटगिरे, विलास पाटील,पांडुरंग शिंदे, राजकुमार कल्याणी, संदिप शिंदे पाटील,वामणराव घोगरे, गंगाधर कांडणगिरे,बाळू तत्तापुरे, संतोष पाटील, वैभव दराडे, लक्ष्मण शिंदे, संभाजी जाधव गुमस्ता संघटनेचे मदन कच्छवे, नरशींग गोरटे हमाल संघटनेचे अध्यक्ष सलिम शेख, उपाध्यक्ष शिवाजी भगत, लक्ष्मण चिटलेवाड, मुबारक शेख, बालाजी वाघमारे, बालाजी कोलेवाड, उत्तम रायभोळे,अलीम शेख,किशन हाणमंते,मोहन मसुरे, शिवाजी दहिकांबळे यांची उपस्थिती होती.

About The Author