अखेर मराठा समाजाच्या आंदोलनासमोर झुकत आमदार संभाजी पाटलांनी घेतली माघार

अखेर मराठा समाजाच्या आंदोलनासमोर झुकत आमदार संभाजी पाटलांनी घेतली माघार

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणादरम्यान शासकीय निमशासकीय तसेच राजकीय कार्यक्रमांचा बहिष्कार करण्याचे सकल मराठा समाज बांधवांतर्फे ठरले होते त्यातच निलंगा चे आमदार श्री संभाजी पाटील यांनी जलसाक्षरता अभियान निमित्त अहमदपूर येथे कार्यक्रम आयोजित केला होता समाज बांधवांतर्फे आयोजकांना सदरील कार्यक्रम रद्द करावा अशी विनंती करण्यात आली होती तरीही त्यांची रॅली हडोळती शिरूर ताजबंद मार्गे अहमदपूर येथे मुक्कामी आली होती.
मात्र रॅली दरम्यान हाडोळती व शिरूर ताजबंद येथील समाज बांधवांच्या तीव्र रोशास त्यांना सामोरे जावे लागले येथील समाज बांधवांनी जागोजागी त्यांचा काळे झेंडे दाखवत व घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला अहमदपूर येथील समाज बांधवांनी अहमदपूर येथे होणारा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा आम्ही जलसाक्षरता कार्यक्रमा विरोधात जलसमाधी घेऊ अशी भूमिका घेतली होती यामध्ये श्री मुकेश पाटील श्री साईनाथ पाटील श्री मधुकर आगलावे श्री बालाजी कदम श्री सुधीर गोरटे श्री शिवराज चौथवे श्री शैलेश जाधव श्री शंकर मुळे श्री गजानन मेकले श्री गोपाळ कानवटे श्री सतीश हासुळे श्री देवानंद मुळे श्री प्रशांत भोसले आदी समाज बांधवांचा समावेश होता त्याबाबतचे सविस्तर निवेदन तहसील कार्यालय पोलीस उपविभागीय कार्यालय यांना दिले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे सकाळपासूनच शेकडो समाज बांधव कार्यक्रम उधळून लावण्याच्या तयारीत होते आमदार संभाजी पाटील यांनी अहमदपूर येथील समाज बांधवांशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शविला आमदार संभाजी पाटील यांनी समाज बांधवांच्या तीव्र भावना लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराज चौक अहमदपूर येथे होणारा त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून शहरात न येताच बायपास द्वारे जाणे पसंत केले.
यावेळी सकल समाज बांधवांनी सांगितले की फक्त आमदार संभाजी पाटीलच नव्हे तर समाजातील इतर कोणत्याही नेत्यांचे कोणतेही कार्यक्रम या उपोषणादरम्यान व शासनास दिलेल्या चाळीस दिवसाच्या मुदतीमध्ये होउ न देण्याची तसेच समाजातील पुढाऱ्यांना गावबंदी करण्याची भूमिका घेतली.

About The Author