आंदोलकांनी आमदार बाबासाहेब पाटील व माजी मंत्री विनायकराव पाटील यांना दाखवले काळे झेंडे
अहमदपूर (गोविंद काळे) : सकल मराठा समाज अहमदपूर यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा अकराव्या दिवशी सकल मराठा समाज महिला भगिनींची उपस्थिती आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकल समाज भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती आजच्या उपोषणामध्ये महिला भगिनींनी भजन गवळण पोवाडे यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले शाहीर सुधाकर जाधव नागठानाकर यांनी अंगावर शहारे उभे करणारे पोवाडे सादर केले तर श्रीमती जनाबाई चावरे, केवळबाई जाधव, शंकूतला माकने, राजाबाई पिटले, भालचंद्र माकने, ढोलकीपट्टू लक्ष्मण सूर्यवंशी यांनी बहारदार लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. आजच्या उपोषणामध्ये श्रीमती सुषमा श्रीधर तराटे साधना समर्थ लोहोकरे वर्षा गोविंदराव शेळके सुवर्णा संतोष रोकडे अंकिता संतोष रोकडे कस्तुरी गोविंदराव शेळके पाटील सुजाता संतोष पाटील ज्योती लक्ष्मण लोहकरे नमिता संतोष रोकडे वर्षा भरत रोकडे अनुराधा विनायक कदम शिवमाला ज्ञानेश्वर वडवळे सावित्रा गणराज हंबीर चावरे जनाबाई व्यंकटराव केवळ बाई भारतराव जाधव राजाबाई बालाजी पिटले रेखा दत्ता गलाले गौरवी विश्वजीत दापके सई सिद्धार्थ दापके आदिती विश्वजीत दापके सरिता विश्वजीत दापके शिल्पा अर्जुन बनसोडे स्नेहा शिव शंकर लांडगे वर्षाताई गोविंदराव शेळके मनीषा गोविंद मुळे गीतांजली आनंदराव जाधव स्वाती धीरज भंडे ज्योती सिद्धार्थ दापके माधुरी गणेश कोदळे मनीषा बालाजी कदम जवळेकर प्रियंका शैलेश जाधव माया मुकेश पाटील निशा गजानन मेकले आदींची उपस्थिती होती.
आज सकाळी माजी मंत्री विनायकराव पाटील कार्यक्रमासाठी जात असताना आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा ताफा अडविला व त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखले यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी समाज भावनेपेक्षा मी मोठा नसून आपला पाठिंबा दर्शवत पुढील कार्यक्रम रद्द केले. शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक बैठकी साठी आमदार बाबासाहेब पाटील हे आले असता आंदोलनकर्त्यांनी तेथे जाऊन काळे झेंडे दाखऊन निषेध केला. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी समाज भावनेचा आदर करत शासकीय कार्यक्रम करणार नाही असे अभिवचन दिले तसेच वेळोवेळी मराठ्यांच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये मागेही आवाज उठवला होता आणि यापुढेही आवाज उठवत राहील अशी भावना व्यक्त केली. समाजभावणेचा आदर करत समाजातील नेत्यांनि राजकीय शासकीय व निमशासकीय कार्यक्रम आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत करू नयेत ह्या भूमिकेचा समन्वयकांनी पुनरूच्यार केला.