उदगीर येथील वीरशैव वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद

उदगीर येथील वीरशैव वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद

उदगीर (प्रतिनिधी) : लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्यावतीने रविवार दि.24 सप्टेंबर 2023 रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय, उदगीर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या वधूवर परिचय मेळाव्यास वधूवर व पालकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले. या वधू-वर मेळाव्यात 500 वधूवरांनी व असंख्य पालकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाची सुरूवात लिंगायत महासंघ व अनुभवमंटप निलंगा येथील महिलांनी सामुहिक इष्टलिंग पुजा, प्रार्थना व महात्मा बसवेश्‍वरांच्या वचनांचे पठन करून केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नल सचिन रंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे होते. यावेळी गोताळा हत्याकांडात निर्दोष असुनही जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या गणेश गुळवे गुरूजींचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंभुलिंग शिवाचार्य महाराज(हावगीस्वामी मठ, उदगीर), किर्तनकेसरी शि.भ.प.भगवंतराव पाटील चांभरगेकर, किर्तनकार मंडळाचे प्रदेशाध्यक्ष शि.भ.प.शिवराज नावंदे गुरूजी, लाडेकर महाराज, येरोळकर महाराज यांच्यासह माजी आ.मनोहर पटवारी, बीआरएस पार्टीचे जिल्हा समन्वयक अ‍ॅड.मल्लिकार्जुन करडखेलकर, सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने, अ‍ॅड.सुरेश पाटील चिघळीकर, मल्लिकार्जुन मानकरी, नागनाथप्पा भुरके, राजाराम पाटील, सिद्रामप्पा पोपडे, विश्‍वनाथप्पा मिटकरी, लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष करीबसवेश्‍वर पाटील, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजोटिकर, सांगली जिल्हाध्यक्ष प्रा.अशोक सावळे, लिंगायत महासंघाचे जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, प्रा.विठ्ठल आवाळे, चंद्रकांत तोळमारे, गणेश पटणे, निळकंठ शिवणे, सुभाष शंकरे, धिरज माकणे, संजय पाटील, चंद्रकांत डांगे, अशोक काडादी, प्रभाकर चोचंडे, शिवानंद भुसारे, महेश भिंगोले, निलेश करंजे, प्रा.मधुबाला हुडगे, दत्तात्रय बिराजदार, शिवशंकर बिडवे, वैजनाथ जट्टे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, जिल्हा उपाध्यक्ष बस्वराज ब्याळे, राजकुमार वडले, महेश धोंडीहिप्परगेकर, संतोष खरोबे, भिमाशंकर शेळके, संजय शिवशेट्टे, समशेट्टी बिरादार, सत्यवान बिरादार, काशीनाथ द्याडे, बापुराव शेटकार, रेवणप्पा बारूळे, अशोक तोंडारे, कालिदास शिरसे, बसवराज विश्‍वनाथ, प्रा.प्रकाश करीअप्पा यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवसांब स्वामी, संजय शिवशेट्टे व महेश धोंडीहिप्परगेकर यांनी तर प्रास्ताविक लिंगायत महासंघाचे लातूर शहराध्यक्ष प्रा.वैजनाथ मलशेट्टे यांनी केले. तर आभार लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बस्वराज ब्याळे यांनी मानले.

About The Author