एकता सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक दिमाखात
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्याची रुद्धा येथील एकता सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनाची मिरवणूक पारंपारिक व सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अतिशय शांत व शिस्तबद्ध डीजेच्या तालावर पार पडली. या मिरवणुकीसाठी विशेष मार्गदर्शन सरपंच गजानन चंदेवाड व उपसरपंच नाथराव केंद्रे यांनी केले. गावातील मानाचा गणपती म्हणून गेली 35 वर्षापासूनची परंपरा आहे यावर्षीही मानाच्या गणपतीला सातव्या दिवशी संपूर्ण गावकरी मंडळीच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये लहान थोर माता भगिनी सर्वांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताला आरतीचे ताट घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. सलग सात दिवस संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन, सर्व लहान बालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे मेजवानी मंडळाकडून देण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मंडळाचे अध्यक्ष भागवत केंद्रे, उपाध्यक्ष अनुरत नागरगोजे, विष्णू होळंबे, भाऊसाहेब केंद्रे, माधव केंद्रे, रोहिदास केंद्रे तसेच धनराज केंद्रे, प्रवीण केंद्रे, सोपान चंदेवाड, सचिन साबळे, प्रवीण गवळे, सुभाष केंद्रे, मयूर केंद्रे, सुधाकर होळंबे, नितीन केंद्रे चैतन्य केंद्रे, शरद केंद्रे, इप्पर रामदास, संभाजी नागरगोजे, माधव होळंबे, नागनाथ नागरगोजे, गोविंद केंद्रे, मोहन नागरगोजे, रोहन केंद्रे, सचिन केंद्रे, मारोती सूरनर, दत्ता सूरनर, प्रकाश चाटे, सतीश केंद्रे, चंद्रकांत गवळे, बळीराम केंद्रे, गणेश चंदेवाड आदी युवक मंडळी सहभागी झाले होते व्यवस्थापक मंडळीच्या भूमिकेमध्ये शिवाजी होळंबे, दत्ता सुरनर, राजू केंद्रे, खोबराजी केंद्रे, मधुकर नागरगोजे दासराव केंद्रे बाबुराव कागणे संभाजी केंद्रे बालाजी केंद्रे वैजनाथ साबळे, सुखदेव केंद्रे, बबन जायभाये, व्यंकटी सुरनर सुरेश चाटे आदी उपस्थित होते.