शिवाजी महाविद्यालयास लघु संशोधन प्रकल्पाची मान्यता
उदगीर (प्रतिनिधी) – शिवाजी महाविद्यालयातील डॉ आर एम मांजरे,डॉ एस डी सावंत, डॉ. डी बी कोनाळे,डॉ एस एम कोनाळे, प्रा बी पी सूर्यवंशी,प्रा रंजन एडतकर या प्राध्यापकांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी लघु संशोधन प्रकल्प मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवलेले होते. त्यांच्या प्रस्तावाची छाननी होऊन, तसेच त्यांच्या मुलाखती घेऊन विद्यापीठाने त्यांच्या विषयाचा आवाका पाहून त्यांना लघु संशोधन प्रकल्पासाठी मान्यता दिलेली आहे. या सर्वांनी वेगवेगळे समाज उपयोगी विषय निवडलेले असल्याकारणाने विद्यापीठाने त्यांना मान्यता दिलेली आहे . त्यांना मान्यता दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ग्रंथपाल डॉ विष्णू पवार ,प्रबंधक बालाजी पाटील ,डॉ व्ही के भालेराव यांची उपस्थिती होती. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.