विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास किती? यातूनच महाविद्यालयाची ओळख – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास किती? यातूनच महाविद्यालयाची ओळख - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : बहुजन समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे महात्मा फुले महाविद्यालय ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय ‘ या ध्येयाने प्रेरित होऊन यशस्वी वाटचाल करीत आहे. या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे कार्य केले जाते, अशा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातूनच महाविद्यालयाची ओळख निर्माण होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मेळाव्याच्या अध्यक्षीय समारोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी, आई. क्यू.ए.सी. चे समन्वयक समन्वयक प्रा. अतिश आकडे, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा वर्षा लगडे, सचिव प्रा. राहुल गायकवाड, पालक प्रतिनिधी गणेश मामा पांचाळ, दक्षिण रुई शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ.सतीश ससाणे, प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचे माहेर असते.माहेरच्या संस्काराच्या शिदोरीने तुम्ही परिपूर्ण झालेले आहात, आपल्या परिपूर्णतेचीच खरी ओळख महाविद्यालय येणाऱ्या नवीन पिढीला करून देते, असे ही ते म्हणाले. यावेळी माजी विद्यार्थी विष्णू पांचाळ, गणेश चव्हाण, रमा गायकवाड, संतोष सोनकांबळे, सलीम पठाण, गंगाधर अमुगे, विखिल विभुते, कोमल पोले, प्रा. लतीफ शेख, प्रा.अर्जुन घोगरे, सुरज पवार, प्रा.राहुल गायकवाड, वर्षा लगडे, भीमाशंकर गणेशपुरे यांच्यासह पालक प्रतिनिधी गणेश मामा पांचाळ, बालाजी शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालयाने दक्षिण रुई शाळेच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य केले. दक्षिण रुईची जिल्हा परिषद शाळा कायम महात्मा फुले महाविद्यालयाच्या ऋणात राहील असेही ते म्हणाले. यावेळी आई.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.अतिश आकडे यांनी नॅक ला सामोरे जातांना आजी-माजी विद्यार्थ्यांची व पालकांची भूमिका या वर यथोचित मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी महाविद्यालयाचा झालेला सर्वांगीण विकास याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.सतीश ससाणे यांनी केले तर ; सूत्रसंचालन ह. भ. प. प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी व आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author