रोटरीच्या वतीने 21 शिक्षकांचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देवून गौरव
अहमदपुर (गोविंद काळे) : सन 2023-24- रोटरी क्लब अहमदपूरच्या लिटरसी मिशनअंतर्गत तालुक्यातील 21 उपक्रमशिल शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनिय कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनलचा राष्ट्र शिल्पकार (नेशनबिल्डर अवार्ड) देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल डॉ हरिप्रसाद सोमाणी, गटशिक्षण अधिकारी श्री बबनराव ढोकाडे,सहय्यक प्रांतपाल विशाल जैन, व अध्यक्ष शिवशंकर पाटील, सचिव श्रीराम कलमे, अनिल चवळे हे उपस्थित होते. तालुक्यातील जि.प.शाळा व खाजगी शाळा मधिल 21 शिक्षकांचा त्यांचे उल्लेखनिय कार्यासाठी गौरव करण्यात आला.
यामध्ये प्रा प्रभाकर बाबुळगांवकर प्रा. सय्यद मुजम्मील, सुनिता कोयले, गणपतराव कौडगावे, आशा राठोड, शांता मद्देवाड, स्वाती क्षिरसागर, राहुल गायकवाड, सुनिता पाटील, रियाज निचलकर, संजय परतवाघ, गोविंदराव शिरसागर, अंकुश पोतवळे,स्वप्ना भालके,प्रमोद यादव, बसवेश्वर थोटे, गौरव चंवडा, अर्चना जबळंदरे, उमाकांत श्रीमंगले ,राजू डाखोरे, राजेन्द्र परगे यांचा समावेश आहे. यावेळी राज्यस्तरिय क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुस्कार (कला) विजेते श्री महादेव खळुरे , जिल्हा आदर्श पुरस्कार विजेते श्री माधव मटवाड यांचाही सन्मान करण्यात आला. श्रीराम गंगथडे संपादीत रोटरीचे मुखपत्र, द पेल्ज चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ.हरिप्रसाद सोमाणी यांनी गुरूंचे महत्व सांगितले विध्यार्थ्यांच्या मेहनत व जिद्दीला गुरुच्या मार्गदर्शनाची साथ मिळाली तर तो खुप मोठे यश मिळू शकते असे सांगतले, गटशिक्षण अधिकारी बबनराव ढोकोडे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास हेच ध्येय ठेवून कार्य कराव असे सांगतिले. तर विशाल जैन यांनी रोटरीच्या कार्याची माहीती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल चवळे यांनी केले सुत्रसंचलन कपिल बिरादार यांनी केले.अध्यक्ष प्रा. शिवशंकर पाटील यांना विविध उपक्रमाची माहीती दिली, पाहुण्यांचा परिचय व आशिष हेंगणे यांनी दिला तर आभार ज्ञानोबा भोसले सरांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवरुद्र सांगवे, श्रीधर लोहारे, धनंजय कोत्तावार , आशिष आंधळे,डॉ चंद्रकांत उगीले महेन्द्र खंडागळे, मोहिब कादरी, डॉ. पांडुरंग कदम,गोपाल पटेल, डॉ. निलेश मजगे, माधव वलसे, प्रा.द.मा. माने, नरसिंग चिलकावर, पांडुरंग पाटील, प्रशांत घाटोळ, प्रा. बालाजी पटवारी, संतोष मद्देवाड, मनोज आरदवाड ,डॉ. मदुसुदन चेरेकर, राहुल घाटोळ, भरत इगे, प्रा. रवी पुणे आदिंसह सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.