कृषि महाविद्यालयाचा रब्बी शेतकरी मेळावा नळगीर येथे संपन्न

कृषि महाविद्यालयाचा रब्बी शेतकरी मेळावा नळगीर येथे संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी ( परभणी ) संलग्नित , डोंगरशेळकी तांडा ता. उदगीर येथील कृषि महाविद्यालयातील बी.एस्सी. ( मानद ) कृषीच्या ” ग्रामिण कृषि जागरूकता कार्यानुभव व कृषि औद्योगिक संलग्नता – २०२३ ” उपक्रमांतर्गत कृषिदूतांनी मौजे. नळगीर येथील बापुदेव मंदिराच्या सभामंडपामध्ये ” रब्बी पीक शेतकरी मेळावा “आयोजित केला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ङॉ.संग्रामजी पटवारी , प्रमुख अतिथी तथा उद्घाटक सै. अंजुषा उगीले सरपंच, नळगीर विशेष अतिथी श्रीयुत .गंगाधररावजी दापकेकर, श्रीयुत. विवेकानंद पेटकर , रेशीम विकास तांत्रीक अधिकारी , लातूर, धोंडीबा उगीले चेअरमन, वि.का. सो. नळगीर, बि.के. कांबळे ग्रामविकास अधिकारी, नळगीर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सुर्यवंशी , उपप्राचार्य ङॉ. आशोकराव पाटील , प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण काकङे, बापुराव नळगीरे, डॉ.सतिष कुलकर्णी, अशोक शेटकार, लक्ष्मण सोनाळे, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून , या शेतकरी मेळाव्याचे रीतसर उद्घाटन झाले .
कार्यक्रम समन्वयक डॉ. दिपाली कोकाटे यांनी सदरील रब्बी शेतकरी मेळावा आयोजनाची पार्श्वभूमी व महत्त्व प्रस्तावित केले . मेळाव्याच्या प्रथम तांत्रीक सत्रात, प्रा. सचिन खंङागळे यांनी हरभरा, करडई ( रब्बी पिके ) व तुर या पिकांवर प्रादुर्भाव करणाऱ्या व नुकसानकारक विविध किडींची ओळख आणि त्यांच्या बंदोबस्तासाठी करावयाच्या उपचारात्मक व नियंत्रणात्मक विविध भौतिक , रासायनिक व जैविक पद्धती बाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. तेजस्विनी जाधव यांनी , रब्बी हंगामातील हरभरा, करडई, राजमा , ज्वारी इत्यादी पिकांमध्ये पेरणीपूर्वी करावयाच्या विविध बीज प्रक्रिया , बियाणे उगवणक्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेचे विविध फायदे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा .बी.बी. निमनवाड यांनी सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानाबद्दलची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. ङॉ.सागर खटके यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीयुत. विवेकानंद पेटकर यांनी शेतीपूरक व किफायतशीर अशा रेशीम शेती जोङव्यवसायाची उभारणी , तुती लागवङ, रेशीम किङ व अंङी पुज संगोपन, विक्री व आर्थिक प्राप्ती आणि विविध शासकीय योजनांची सखोल माहिती दिली. बि.के. कांबळे यांनी शेती पुरक विविध व्यवसाय उदा . बांबु लागवङ , दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, फळबाग लागवङ इत्यादी जोडधंदे शेतकऱ्यांनी करावेत , असे आवाहन केले केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की माती व पाणी तपासणी , किङ – रोगांचे योग्य निदान व त्यावरील उपाय योजनांच्या तांत्रिक सल्ल्याची मोफत सेवा महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडून उपलब्ध केली जाईल, याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा असे आवाहन केले. तसेच, शेतीविषयक अद्यावत तंत्रज्ञान, शेतीपुरक विविध व्यवसाय व अनुषंगिक क्षेत्रांतील शास्त्रोक्त माहिती परिसरातील शेतकऱ्यांसाठी या महाविद्यालयातून देण्याचे कार्य अविरतपणे चालूच राहील, असे नमूद केले .
अध्यक्षीय समारोपामध्ये ङॉ.संग्राम पटवारी यांनी, या कृषी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा, तज्ञ प्राध्यापक, शेतीतील नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रयोग, आधुनिक कृषी तंत्रज्ञान व अनुषंगिक सोयी – सुविधांचा परिसरातील शेतकरी बांधवांनी हक्काने लाभ घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नतीसाधावी, असे कळकळीचे आव्हान केले .
कार्यक्रम समन्वयक ङॉ. दिपाली कोकाटे, कार्यक्रम अधिकारी ङाॅ. प्रशांत राठोड, डॉ. विजय शिंदे, प्रा. बी. बी. निमनवाड, प्रा. शीतल पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, नळगीर, अवलकोङा, मन्न उमरगा,मोरतंळवाङी, पिंपरी, कल्लूर, खेर्ङा,नागलगाव, बाणमी व मोघा येथील रावेच्या कृषि दूतांनी , सदरील रब्बी शेतकरी मेळाव्याचे नियोजनबद्ध आयोजन केले. या मेळाव्यास परिसरातील शेतकरी बंधू-भगिनी, प्रगतशील शेतकरी, ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक , व्यवसायिक बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील ङि.ङी.ओ. ङॉ.अनंद दापकेकर, ङॉ. ङि. जी. पानपट्टे, ङॉ. एस.बी. माने, ङॉ. एस.एल. खटके, ङॉ.एस.एन. वानोळे, प्रा. व्हि. एल. सोमवंशी, इतर प्राध्यापक/प्राध्यापीका, कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कृषिदूत हेमंत पटणे यांनी तर विशाल पाटील यांनी उपस्थितांचे ऋणनिर्देश व्यक्त करून, अध्यक्षांच्या परवानगीने मेळाव्याची यशस्वी सांगता झाली.

About The Author