राष्ट्रीय आरोग्य नियंत्रणामध्ये विविध चिकित्सा पद्धतींची मोलाची भूमिका – ना. संजय बनसोडे

0
राष्ट्रीय आरोग्य नियंत्रणामध्ये विविध चिकित्सा पद्धतींची मोलाची भूमिका - ना. संजय बनसोडे

राष्ट्रीय आरोग्य नियंत्रणामध्ये विविध चिकित्सा पद्धतींची मोलाची भूमिका - ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय आरोग्य नियंत्रणामध्ये विविध चिकित्सा पद्धतीचा सिंहाचा वाटा असून भारतीय चिकित्सा पद्धतीने मोलाची भूमिका बजावली असे विचार नामदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर द्वारा आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्डिओलॉजी,न्यूरो-सायकोलॉजी अँड नेफ्रो-यूरोलॉजी या राष्ट्रीय परिसंवाद संभाषा-2024 प्रसंगी उद्घाटन प्रसंगी बोलताना क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांनी उपरोक्त उद्गार काढले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबासाहेब पाटील हे होते तर प्रमुख अतिथी डॉ.मिलिंद निकुंभ,डॉ.विलास हरपाळे,डॉ.दिलीप वांगे,सुशांत शिंदे,रामेश्वर गोरे,बळीराम भिंगोले,अंकुशराव कानवटे,साहेबराव जाधव,डॉ.मुकुंद बंडले,भरत चामले,डॉ.दत्तात्रय पवार,सुदर्शन मुंडे,डॉ.माणिक कुलकर्णी,डॉ.रत्नेश्वर धानुरे,श्री.धनाजी मुळे,आदि उपस्थित होते.
धन्वंतरी पूजन-स्तवन व दीपप्रज्वलनाने परिसंवादाची सुरुवात झाली.उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा पाहुणे व तज्ज्ञ वक्त्याचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांनी करून दिला.
सदरील राष्ट्रीय परिसंवादासाठी संपूर्ण देशातून ऍलोपॅथी,आयुर्वेद,होमिओपॅथी,नर्सिंग,फिजियोथेरेपी व योग क्षेत्रातील एकूण 934 डॉक्टर्स, शिक्षकवृंद,संशोधक,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी विविध चिकित्सा पद्धतीच्या एकूण 18 अभ्यासू व तज्ज्ञ डॉक्टरांचे व्याख्यान संपन्न झाले.तर पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.शिक्षण घेणारे डॉक्टर्स, शिक्षक वृंद व संशोधक तथा विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे 67 संशोधन पत्र सादर करण्यात आले तथा एकूण 115 जणांच्या पोस्टर व आरोग्य विषयक माहिती-चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना प्रति कुलगुरू डॉ.मिलिंद निकुंभ म्हणाले, विविध चिकित्सा पद्धतींचा समन्वय ही काळाची गरज आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक द्वारा संशोधनकार्यासाठी स्कॉलरशिपच्या स्वरूपात प्राध्यापक,डॉक्टर्स,संशोधक,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना आर्थिक सहाय्य केले जात असल्याचे सांगून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी औषधी किंवा अन्य पेटंट मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटन पर भाषणात पुढे बोलताना ना.संजय बनसोडे म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात संशोधनात्मक कार्य ही निरंतर प्रक्रिया आहे.वैद्यकीय क्षेत्रमध्ये संशोधनामुळे नवीन उपचार-उपक्रमाची माहिती मिळते.बदलत्या जीवनशैलीमुळे आर्थिक समस्या व मानसिक ताणतणाव याला अनेक जण सामोरे जात आहेत तथा जंक फूडचे सेवन,व्यसनाधीनता व व्यायामाचा अभाव यामुळे रोग निर्माण होत आहेत आणि प्रसंगी रोग अंगावर काढल्यामुळे तो असाध्य अवस्थेकडे जात आहे.अशावेळी डॉक्टरांनी विविध प्रबोधन उपक्रमाच्या माध्यमातून विविध रोग विषयक माहिती देणे गरजेचे आहे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात आ.बाबासाहेब पाटील म्हणाले की विविध चिकित्सापद्धतीचा एकाच ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय परिसंवाद ही अभिनव संकल्पना आहे.त्यामुळे त्या-त्या चिकित्सा पद्धतीमधील अद्ययावत माहितीचा लाभ डॉक्टर्स व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या माध्यमातून रुग्णांना होऊ शकतो.प्रत्येक चिकित्सा पद्धतीच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी फॅमिली डॉक्टर या भूमिकेतून चिकित्सक व समुपदेशक म्हणून कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या प्रसंगी डॉ. विलास हरपाळे व डॉ.दिलीप वांगे यांची समयोचित भाषणे झाली.
सूत्रसंचालन डॉ.प्रशांत बिरादार व डॉ.राखी वरनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.पुष्पा गवळे यांनी केले.
सदरील राष्ट्रीय परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद,वैद्यकीय अधिकारी,आंतरवासियता प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *