नाशिक ! हरित संकल्पनेवर आधारित न्यायालयाची वास्तू

नाशिक ! हरित संकल्पनेवर आधारित न्यायालयाची वास्तू

नाशिक (दत्तू वाघ) : जिल्हा न्यायालयाच्या सात मजली इमारतीसाठी निविदा प्रसिद्धद झाल्यामुळे पुढील काही वर्षांत हरित संकल्पनेवर आधारित न्यायालयाची राज्यातील ही पहिलीच इमारत ठरणार आहे. न्यायालयाच्या आवारात सध्या जागेची कमतरता आहे. नव्या इमारतीमुळे पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होईल. आजवर जागेअभावी कौटुंबिक, सहकारी आणि औद्योगिक न्यायालय येथे येऊ शकले नव्हते. या न्यायालयांसह अन्य नवीन न्यायालये, परिक्रमा पीठ येथे येण्याचा मार्ग नव्या इमारतीमुळे प्रशस्त होणार असल्याचे नाशिक वकील संघाने म्हटले आहे. वकिलांसह पक्षकारांचीही जागेची अडचण दूर होणार आहे.

राज्य शासनाने शहरात नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला फेब्रुवारी २०२० मध्ये मान्यता दिली होती. याच काळात येथे आयोजित वकील परिषदेप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत इमारतीचे भूमिपूजन झाले होते. करोनाच्या संकटामुळे या संदर्भातील प्रक्रिया लांबणीवर पडली. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निविदा प्रसिद्ध झाल्याचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी सांगितले. नव्या इमारतीसाठी वकील संघाने पाठपुरावा के ला होता. काही न्यायालयांचे कामकाज अतिशय कमी जागेत चालते. वकिलांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी व पक्षकारांसाठी बसायला जागा उपलब्ध नव्हती. जागेची कमतरता दूर करण्यासाठी न्यायालयास लागून असणारी पोलीस मुख्यालयातील अडीच एकर जागा मिळविण्यात आल्याचे अ‍ॅड. ठाकरे म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार नवीन जिल्हा न्यायालय बांधण्यासाठी १७१.१७ कोटीच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. न्यायालयाची ही भव्य इमारत हरित इमारत संकल्पनेवर आधारित असणार आहे. सौर ऊर्जेसाठी व्यवस्था, पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, अपंग बांधवांसाठी खास पायऱ्या, अंतर्गत आणि बा विद्युतीकरण, सरकते जिने आदींचा त्यात समावेश आहे. तसेच या इमारतीसमोर भविष्यात वाहनतळासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. निविदेत हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन घातलेले आहे.

नवीन इमारतीची वैशिष्टय़े

  •  तीन लाख ६६ हजार ८४८ चौरस फूट क्षेत्रफळ
  •  एकूण ४५ न्यायालयांचा समावेश
  •  न्यायालयीन कार्यालय आणि सरकारी अभियोक्ता कक्ष
  •  ग्रंथालय आणि संगणकीय सव्‍‌र्हर कक्ष
  •  दूरदृश्यप्रणाली चर्चा कक्ष
  •  बैठक कक्ष आणि उपाहारगृह

जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीमुळे जागेच्या कमतरतेचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. सध्या आठ ते दहा न्यायालयांसाठी जागा अतिशय कमी आहे. वकिलांसाठी जागा नाही. पक्षकारांना बसायला जागा नव्हती. जागेअभावी काही न्यायालये आजवर येऊ शकली नाहीत. पुरेशी जागा उपलब्ध झाल्यामुळे कौटुंबिक, औद्योगिकसह अन्य न्यायालय तसेच ऋण वसुली न्यायाधिकरणचे खंडपीठ, भविष्यनिर्वाह निधीचे परिक्रमा पीठ येथे येऊ शकतील.

– अ‍ॅड. नितीन ठाकरे (अध्यक्ष, नाशिक वकील संघ)

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!