मतदार राजा… जागा हो..!
“राष्ट्रीय मतदार दिवस”
भारतात निवडणूक आयोगाची स्थापना दि. 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जात आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. भारत लोकशाही प्रधान देशात मतदार हाच खऱ्या अर्थाने राजा आहे. मतदारांमध्ये जनजागृती तसेच बळकटी करणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, हे या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने अधोरेखित करायला हवे.
नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी तसेच नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करावी, या गोष्टींची जनजागृती होण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. भारत सरकारने नागरिकांचे निवडणुकीत योगदान वाढावे, यासाठी सन-2011 पासून “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या लोकशाही राज्यपद्धतीने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा हा हक्क बजाविण्यासाठी मतदान करावे.
गणराज्य दिनाच्या एक दिवस आधी “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्यामागचे कारण असे की, भारत निवडणूक आयोगाची स्थापना दि.25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो. दि.26 जानेवारी 1950 च्या ( प्रजासत्ताक दिन) आधी एक दिवस निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण भारतीय लोकशाहीत मतदारच मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करीत असतात.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नाव मतदारयादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आणि सामाजिक कर्तव्यही आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.
आपल्या देशातील लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन स्तरावरून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित करून गाव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वय वर्षे 18 ते 19 या वयोगटातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण सध्याच्या जास्तीत जास्त व्हावे, हे उद्दिष्ट. युवक मतदारांची नोंदणी वाढविण्याकरीता विद्यापीठे, महाविद्यालये आणि त्यांचे युवक प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यात येतो. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमार्फत नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व पटवून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात येते.
मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपल्या मतदानाच्या मार्गाने मोलाचे सहकार्य लाभावे, हीच लोकशाहीप्रधान देशाच्या द्दष्टीने अपेक्षा. मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. शहरी भागात दूरदर्शन, सिनेमागृहे, केबल टिव्ही इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. वेबसाईट व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नवीन मतदारांमध्ये जनजागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केले जाते. गाव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्याह निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देशात मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी, तसेच आपल्या लोकशाहीप्रधान देशात मतदारअधिक जागृत होऊन मतदानाचा हक्क निर्भय पणे बजावू शकतो. भारत सरकारच्या महान कार्यात आपणही सहभागी होऊन मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपल्या हातून देशाची सेवा घडावी, भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहुना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे होय. म्हणूनच हा दिवस भारतात निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी दि. 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा केला जातो.
मतदार नोंदणी आवश्यक का ?
◆ वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपले नाव मतदारयादीत नोंदणी करणे महत्त्वाचे…
◆ लोकशाही प्रधान भारत देशात मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजले जाते… यासाठी मतदान नोंदणी आवश्यक.
◆आपण आपला मनपसंत उमेदवार आपल्या नोंदणीमुळे निवडून आणू शकतो… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे…
◆ माझे एक मत देण्याने काही फरक पडणार नाही, हा आपला गैरसमज असून आपले मतदान अमूल्य आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ लोकशाही प्रधान भारत देशात प्रत्येक भारतीय नागरिकांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
◆ देशाच्या प्रगतीत युवकांचे/नागरिकांचे योगदान वाढावे… यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
लेखन:
श्री.हेमकांत साेनार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रक्तपेढी) जिल्हा सामान्य रुग्णालय
(मो.क्र :-9511882578)
रायगड-अलिबाग
संपादन : रायगड – अलिबाग
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग