Police Flash News

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या सार्वजनिक जयंती निमित्त उदगीर ग्रामीण भागात विविध कार्यक्रम संपन्न

0
21
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या सार्वजनिक जयंती निमित्त उदगीर ग्रामीण भागात विविध कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 126 सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने उदगीर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे यांचे विचार पसरवण्यासाठी विविध कार्यक्रमाची आखणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.

समाज सुधारक, लोककवी आणि साहित्यिक म्हणून जगाला परिचित असले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव अजरामर आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उपेक्षित, दलित व कामगार वर्गाच्या हक्कासाठी आणि समाज परिवर्तनासाठी वाहून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी समाजाची जडणघडण करण्यासाठी केलेले कार्य हे सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध तीव्र संघर्ष केला. हा संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी लोकाभिमुख होत त्यांनी लालबावटा कलापथक आणि सांस्कृतिक चळवळीची स्थापना केली. अण्णाभाऊंनी लाल बावटा कलापथकांची कीर्ती गाजवली. लोकप्रबोधन करण्यासाठी तमाशा, पोवाडे आणि लावणी या लोककलांचा वापर करत त्यांनी समाज प्रबोधनाचे हत्यार म्हणून मनोरंजनातून लोकांना विषयाचे गांभीर्य पटवून दिले. कामगार आणि ग्रामीण जनतेत अन्यायाविरुद्ध लढा देण्याची चेतना निर्माण करण्यासाठी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंनी गाजवलेले कार्य लोकाभिमुख आहे.

मुंबई गुजरातला जोडण्याच्या प्रयत्नाच्या वेळी मुंबई कोणाची, आमची! यासारख्या शाहिरी रचनांनी आणि लावण्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये अभूतपूर्व ऊर्जा निर्माण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले. दारिद्र्यामुळे त्यांना शिक्षण घेता नाही आले तरी उच्च शिक्षण घेतलेल्या माणसाला देखील लाजवेल, इतक्या ताकतीचे लिखाण त्यांनी केले आहे. 35 कादंबऱ्या, पंधरा कथासंग्रह आणि अनेक नाटके त्यांनी लिहिले आहेत. त्यांची फकीरा ही कादंबरी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवून अजरामर झाली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांचे खरेखुरे जग आपल्या साहित्यातून मांडल्यामुळे त्यांना दलित साहित्याचे प्रणेते मानले जाते. अशा शब्दात स्वप्निल अण्णा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून अण्णाभाऊंच्या कार्याची ओळख समाजाला होण्यासाठी आणि समाज हिताची जाण तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातून अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावर्षी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये वाढवणा येथे मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढवणा महोत्सव घेऊन परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना कलेमध्ये रुची निर्माण केली. तसेच ज्यांच्या अंगी कलागुण आहेत, त्यांच्या कलागुणांना आकार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवून युवा वर्गाला आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचा हा कार्यक्रम स्वप्निल अण्णा जाधव यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश फुले तसेच सामाजिक जाण असलेले राजू किनीकर, पांडुरंग परेड, सारंग आगलावे, मंगेश येरकुंडे, दत्ताभाऊ बामणे, सोनू माळी उपसरपंच प्रमोद बिरादार, संगम आष्टुरे, गंगाधर भांगे, महादेव कांबळे, नागेश ठोंबरे, बबन भांगे, शैलेश जाधव, महावीर भांगे, प्रीतम जाधव, कृष्णा जाधव, बाळासाहेब जाधव, सुरज जाधव, उद्धव अंधारे, कृष्णा मारुती जाधव, अशोक अंधारे, अंगद जाधव, मिलिंद जाधव, गणपत जाधव, शिवाजी जोंधळे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

वाढवणा महोत्सवातील सामूहिक आणि वैयक्तिक नृत्य स्पर्धेसाठी मोठमोठी पारितोषिके ठेवल्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि तरुणांनी या नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण दाखवले. कला जोपासण्याचा सल्लाही याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला. भविष्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात गावोगावी घेण्याची गरज असल्याचे स्वप्निल अण्णा जाधव यांनी स्पष्ट केले. समाजातील तरुणांनी एकत्र येऊन भावी पिढीचा विचार करून सामाजिक कार्यामध्ये वेळ द्यावा. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts