लातूर जिल्हा

पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामविस्तारासाठी मोठा संघर्ष, लढा द्यावा लागला – प्रा. बालाजी आचार्य

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित गोरगरिब महिलांना साडी-चोळी वाटप व...

मराठीच्या वैभवशाली परंपरेचा मराठी भाषकांना सार्थ अभिमान – डॉ. विठ्ठल जंबाले यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन काळात महानुभावांनी आणि वारकऱ्यांनी मराठीतील दर्जेदार साहित्य लिहून, मराठी भाषेला कलात्मक उंचीवर नेले. तर छत्रपती...

गोंदेगाव ग्रामपंचायतीवर गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

दुरंगी लढत : नऊ पैकी सहा जागेवर एकतर्फी विजयलातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचातीअंतर्गत गोंदेगाव बचाव ग्रामविकास पॅनल व...

साई ग्रामपंचायतीवर युवा परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

दुरंगी लढत : नऊ पैकी पाच जागेवर विजयाचा झेंडा लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील साई ग्रामपंचायत निवडणुकीत साई युवा परिवर्तन...

अहमदपूर नगर परिषदेच्या व्यापारी संकुल बांधकामाचा शुभारंभ

शहरातील शासकीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार - आमदार बाबासाहेब पाटील अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील शासकीय कार्यालयांच्या बांधकामासाठी...

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना लोकसंवाद पुरस्कार जाहीर

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसंवाद...

द्वारकादास श्यामकुमार ग्रुपकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षरोपे भेट

ग्रुपकडून दरवर्षी फुले महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून दत्तक घेऊन तुकाराम पाटील हे पालकत्त्व स्वीकारतात अहमदपूर (गोविंद काळे) : येथील...

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित

थकबाकी भरण्याचे ‘महावितरण’चे ग्राहकांना आवाहन मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित...

गाडी चालवितांना आपल्या परिवाराचा विचार करावा – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

32 वे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ लातूर (प्रतिनिधी) : आपल्या देशात दरवर्षी 1 लाख 50 हजार लोक अपघातांमुळे मृत्यूमुखी जातात....

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!