रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज – विद्या रामराव होनमाने (टाळकुटे)
जाती धर्माच्या भिंती भेदून
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य प्रथमत: शिवरायाच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम…. आज कुळवाडीभुषण प्रजाहितदक्ष, स्त्रियांचे रक्षक, वीर, पराक्रमी छत्रपती शिवराय यांच्या 380 व्या जयंती निमित्ताने मी सर्वांना हार्दीक, हार्दीक शुभेच्छा देते.
जगातील महान राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची एक मराठा योध्या व मराठा साम्राज्याचे संस्थापक या नावाने ओळख आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर सबंध देशामध्ये तसेच जगामध्ये शिवाजी महाराजांचे आदराने आणि सन्मानाने नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगात आहे. शिवाजी महाराजांना जगभर पोहचविण्याचे कार्य जर प्रथमत: कोणी केले असेल तर लोकशाहीर, साहित्यरत्न, शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रशियाच्या चौका-चौकात शिवाजी महाराजांचा पोवाडा गायीला तो असा –
“ प्रथम मायभू चरणा !
छत्रपती शिवबा चरणा !
स्मरुणी गातो कवणा !!”
अण्णा भाऊ साठे यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची ख्याती विदेशी भुमिवर गायली. आणि आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे शौर्य व कार्य याची प्रचिती जगाला करुन दिली. शिख धर्माचे असुन सुद्धा फासावर चढत असतांना भगतसिंगानी छत्रपती शिवरायांना स्मरण केले ते असे –
“मेरा रंग दे बसंती चोला ओय…
रंग दे बसंती चोला…
जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पे…”
अश्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची ख्याती संपुर्ण जगामध्ये आहे. शिवाजी महाराज शूरवीर योद्धा , प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी असलेले दृष्टे राजा होते. म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते, महाराजांनी संपुर्ण आयुष्य रयतेसाठी, जनतेसाठी जगले असं मला या ठिकाणी आवर्जुन सांगावसे वाटते.
शिवाजी महाराजांचा जन्म जुलिअन दिनदर्शिकेनुसार 19 फेब्रुवारी 1630, रोजी पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा म्हणत असे. शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदखेड च्या लाखोजी जाधवांची कन्या. त्या अतिशय धार्मिक आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले. आई जिजाऊंची ही शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला होता. आई जिजाऊंनी शिवरायांना विद्वानांची कदर करण्याचे धडे दिले. त्यासबंधी मला सांगावसे वाटते.
“एक पुरुषार्थी भी, एक विद्वान के सामने झुकता है…..
एक पुरुषार्थी भी, एक विद्वान के सामने झुकता है…
क्योंकि पुरुषार्थ विद्या से ही आता है… विद्या से ही आता है….”
अश्या प्रकारे आई जिजाऊंनी ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे शिवबाला पटवुन सांगितले. विद्वानांच्या सहवासात राहावयास शिकविले. विद्येचे महत्त्व सांगुन नीतिचे धडे शिकविले. जिजाऊंच्या शिकवणीमुळे शिवाजी महाराजांची जडण-घडण झाली आणि ते स्वराज्य स्थापनेसाठी सहायभुत ठरले. शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती मात्र ते योग्य मार्गदर्शनाशिवाय शक्य नव्हते ते योग्य मार्गदर्शन आई जिजाऊंनी शिवबाला दिले.
शिवाजी महाराजांनी प्राण पणला लावुन आदिल शहा च्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूला असलेले चाकण, कोंढाणा, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा मिळवत स्वराज्यापाया मजबुत केला. शिवाजी महाराजांना रोकण्यासाठी मुगल सम्राटांनी अफझल खान यांना पाठविले मात्र शिवरायांनी अत्यंत शौर्याने त्यावरही मात करुन त्याचा वध केला. याबद्दल मला म्हणावेसे वाटते.
“शत्रु चाहे कितना ही बलवान क्यों न हो,
उसे अपने इरादों और उत्साह मात्र से ही परास्त किया जाता है….” —–(2)
यानंतर 1674 मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. पंडित गागा भट्टांनी हा राज्यभिषेक विधी पार पाडला. शिवाजी महाराजांनी स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि त्यांनी शेवटपर्यंत स्त्रियांचा आदर केला. त्यांनी मावळ्यांना सक्त ताकीद दिली होती कि, स्त्री ला इजा किंवा अनादर होईल असं वागु नका. मावळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या असिम शौर्याने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये किल्ले उभारले. अश्या या थोर राजांचा मृत्यु 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला.
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी म्हणावेसे वाटते. छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा असेही म्हणतात. शिवजयंती साजरी करत असताना शिवरायाबद्दल मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर राजे आज असते तर देशात चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली ह्या झाल्याच नसत्या. सर्व जाती धर्माचे लोक गुणा गोविंदाने राहिले असते. देश आज प्रगतिशिल नसुन प्रगत राहत अमेरीका आणि इंग्लडची बरोबरी करु शकला असता असेही मला शेवटी म्हणावेसे वाटते.
धन्यवाद …!
विद्या रामराव होनमाने (टाळकुटे)
‘आनंद निवास’ लेक्चर कॉलनी,
थोडगा रोड, अहमदपुर
मो. नं. 8830101061