तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी कोण प्रयत्न करणार!
31मे तंबाखू विरोधी दिवस
शालेय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आपापल्या पद्धतीने तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदीचे पत्र काढून गुटखाबंदी साठी प्रयत्न करीत आहेत. पण सामान्य माणूस या बंदी कडे दुर्लक्ष करीत आहे.ज्यांचा व्यवसाय तंबाखूजन्य पदार्थांवर आहे, तो व्यक्ती या पदार्थांची विक्री सर्रास करत आहे. गुटखाबंदी हा नियम महाराष्ट्रात कृतीमध्ये कधी लागू होणार? शासन मनावर घेतले तर कडक लाँकडाऊन होऊ शकतो. आचारसंहिता आमलात आणली जाते.गुटखा बंदीवर का कठोर कारवाई होत नाही ? विक्रीवर बंदी आहे पण उत्पादन घेण्यावर…? का बंदी नको? तंबाखूमुक्त शाळा अभिमान हा उपक्रम महाराष्ट्रात राबविला जात आहे.नवीन पिढी तंबाखूजन्य पदार्थापासून दूर रहावे हा मुख्य हेतूने हा उपक्रम राबविला जातो.पण शाळेच्या वेळेव्यतिरिक्त नवीन पिढी,मुले बाहेर काय करतात …यावर नियंत्रण कोण ठेवणार? सर्वांनी मिळून तंबाखूच्या उत्पादनावर व विक्रीवर बहिष्कार टाकून कडक बंदीसाठी प्रयत्न करायला हवे.तरच संपूर्ण महाराष्ट्र तंबाखूमुक्त होणार!
कोरना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लाँकडॉऊन प्रथम काळात सर्व पानटपऱ्या बंद होते. त्या मागील पाच महिन्यांच्या काळात पानपट्टी बंद असून सुद्धा गुटखाविक्री मात्र सर्रास चालू होते.तंबाखू सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुटखा,खर्रा,रजनीगंधा इतर सुपारीच्या पिचकार्या रस्त्यावर आढळून येत आहेत.शासन थुंकन्यास बंदी घातली आहे.मात्र योग्य ती अमलबजावणी होत नाही. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक जिल्हा प्रशासनाने पानटपऱ्या बंद केल्या होत्या. एप्रिल ते ऑगस्ट पान टपरी बंद होते. पण चोरीच्या मार्गाने व्यवसाय चालू होता. दहा रुपयांची सुपारी तीस रुपयाला विक्री झाली. पाच रुपये किमतीचा जर्दापुडी (तोटा) ३० रुपयांनी विकला गेला.याच सुपारीचे दरही वाढले. चौपट दराने विक्री होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर नेमके आळा कधी बसणार? शासन स्तरावर कागदोपत्री गुटखा बंदी आहे. पण बाजारपेठेत प्रत्येक पान टपरी मध्ये गुटखा सुपारी मिळतेच… त्याशिवाय पान टपरी हा व्यवसाय चालू शकत नाही.बरेच पान शाँप मध्ये पान नसतेच…फक्त गुटखा सुपारी. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री लॉकडाउनच्या काळात सर्वात अधिक प्रमाणात झालेली आढळून येते.व्यवसाय धारक या काळात चांगली कमाई करुन घेतले आहेत व सध्या पणघेत आहेत.केवळ पान शाँपवरच तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री होते असे नाही,तर ग्रामीण भागात किराणा दुकान,हाँटेलमधून ही विक्री झाली आहे. महाराष्ट्र शासनाने एखाद्या वस्तूवर बंदी घातली….म्हणजे समजायचे की त्या वस्तूचे दर वाढणारच! त्या वस्तूची विक्री अमाप दराने होणारच.बंदी म्हणजेच अधिक उत्तपन्नाचे साधन होय. बंदी गुटख्याची असो अथवा दारूच्या विक्रीची… मात्र ज्यास्तीचे विक्री होणारच!प्रशासनाला याची माहिती मिळत असते.पण हवे तसे कारवाई होत नाही.हीच फार मोठी खंत आहे.
तंबाखूचे दुष्परिणाम माहिती असतानादेखील अनेकांना तंबाखू सेवनाचे व्यसन जडले आहे. तंबाखू सेवनामुळे अनेक आजार होण्याची चिन्ह दिसून येतात. जगभरात तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांचे ७० टक्के रुग्ण हे भारतात असल्याचे समोर आले आहे. नुकतेच ब्रिटनमधील यार्क विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. तंबाखूच्या उत्पादनावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्याची सूचना या संशोधनात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदी घातल्यामुळे तंबाखू खाण्याचे प्रमाण कमी होईल आणि कोविड-१९ च्या प्रसाराला आळा बसेल असे संशोधनात म्हटले आहे.
भारतातील कर्करोगाची संख्या यावर्षी १३.९ लाख असून ती २०२५ पर्यंत १५.७ लाखापर्यंत जाणार असल्याचा अंदाज भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद (आयसीएमआर) या बंगलोर येथील राष्ट्रीय रोग सूचना विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीडीआयआर) यांनी व्यक्त केला आहे. यात महिला रुग्णाची संख्या तुलनेने जास्त असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार यंदा पुरुष कर्करोगाची संख्या सहा लाख ७९ हजार ४२१ एवढी गृहीत धरली असून २०२५ पर्यंत ती सात लाख ६३हजार ५७५ पर्यंत पोहोचेल.यात महिलांना कर्करोग होण्याचे प्रमाण या वर्षी अंदाजे सात लाख आहे तर २०२५ पर्यंत बारा लाख होण्याची चिन्हे आढळून येत आहेत.
वरील गोष्टीचा विचार करुन राज्यातुन सर्वच स्तरावरुन विरोध करणे अपेक्षित आहे.व्यसन हे शरिरासाठी हाणिकारकच आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनापासून अनेक अजार उद्वभतात.यामूळे तंबाखू,गुटखा,सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थावर व उत्पादनावर कडक बंदी लादली पाहिजे.
महादेव शरणप्पा खळुरे
मो ८७९६६६५५५५
(लेखक तंबाखूमुक्त शाळा अभियान लातूर जिल्हा समन्वयक आहेत.)